Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा आज 57 वा दिवस असून हे युद्ध अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आपली ताकद दाखवत रशिया युक्रेनवर दररोज हल्ला चढवत आहे. यामध्येच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे देखील मागे हटण्यास तयार नाही. दरम्यान, येत्या 24 तासांत रशिया युक्रेनचे मारियुपोल शहर ताब्यात घेईल, असा दावा केला जात आहे.


रशियन सैन्याने दावा करत सांगितलं आहे की, ते येत्या 24 तासांत युक्रेनचे मारियुपोल शहर ताब्यात घेतील. तर अशातच आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू आणि शरणागती पत्करणार नाही, असे युक्रेनच्या लष्कराच्या कमांडरने सांगितले. याच दरम्यान झेलेन्स्की यांनी घोषणा केली की, ते सर्व रशियन कैद्यांची सुटका करणार आणि त्या बदल्यात रशिया सर्व युक्रेनियन नागरिक आणि सैनिकांना मारियुपोलमध्ये सुरक्षितपणे बाहेर निघण्याची परवानगी देणार आहे.


बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची तुलना मगरीशी केली 


काही दिवसांपूर्वीच इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे युक्रेनच्या रस्त्यावर झेलेन्स्की यांच्या सोबत दिसते होते. त्यांनी युक्रेनच्या शहरातील लोकांची भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेतली आणि उद्ध्वस्त झालेल्या भाचा दौराही केला. यावेळी बोलताना बोरिस म्हणाले होते की, चर्चेदरम्यान पुतिन यांचे वर्तन एखाद्या मगरीसारखे असते. ज्याच्या जबड्यात तुमचा पाय अडकला आहे. यावेळी बोरिस यांनी पाश्चिमात्य देशांना युक्रेनला शस्त्रपुरवठा सुरू ठेवण्याचे आवाहन केले.


दरम्यान, युक्रेनचे म्हणणे आहे की 24 फेब्रुवारी रोजी रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून सुमारे 300,000 लोक मानवतावादी कॉरिडॉरद्वारे देशभरातील लढाईतून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनच्या 50 लाखांहून अधिक नागरिकांनी आपला देश सोडल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: