Afghanistan Blast:  अफगाणिस्तानमधील बल्ख प्रांतातील मजारशरीफ शहरातील एका मशिदीत मोठा स्फोट झाला. या स्फोटात किमान 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. मजार-ए-शरीफच्या सूत्रांनी सांगितले की, शहरातील वर्दळीचे ठिकाण असणारे सेह डोकान मशिदीत स्फोट झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कमीत कमी 20 मृतदेह आणि 65 जखमींना अबू अली सिना बाल्खी रुग्णालयात दाखल झाले आहेत. 


काबूलमधील स्फोटात दोन मुलं जखमी


अफगाणिस्तानची राजधानी  काबूलमध्ये गुरुवारी रस्त्याजवळ झालेल्या स्फोटात दोन लहान मुलं जखमी झाले आहेत. काबूल पोलीस प्रवक्ते खालिद जदरान यांनी सांगितले की, पश्चिम काबूलमधील निर्जनस्थळी रस्त्याच्या शेजारी स्फोट झाला. या ठिकाणचा जवळपासचा परिसर शिया बहुल परिसर आहे. या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने घेतली नाही. 


दोन दिवसांपूर्वी या भागात प्रशिक्षण केंद्र आणि शाळेवर हल्ला करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार शिया समुदायाला लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 8 मुलांचा मृत्यू झाला आहे. काबूलमधील दश्त-ए-बरची भागात हा हल्ला झाला. अब्दुर रहीम शाहिद हायस्कूलवर तीन ते पाच आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यापैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला आहे. हा स्फोट झाला तेव्हा अनेक विद्यार्थी वर्गात होते. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.


दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तान सुरक्षित आणि दहशतवाद मुक्त असल्याचा दावा केला होता. मात्र, मागील काही दिवसात झालेल्या स्फोटामुळे तालिबानच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: