Tiny Radioactive Capsule Missing : ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) एक छोटी रेडिओ ॲक्टिव्ह कॅप्सूल (Radioactive Capsule) गायब झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. चालत्या ट्रकमधून ही कॅप्सूल हरवली आहे. ही रेडिओॲक्टिव्ह कॅप्सूल गायब झाल्याने पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये हाय रेडीएशन अलर्ट जारी करण्यात आला आहे. या रेडिओ ॲक्टिव्ह कॅप्सूलचा वापर खाणकामात केला जातो. या कॅप्सूलचा हत्यार म्हणून वापर करता येणार नाही, पण यामुळे रेडीएशन पसरू शकतं. या रेडीएशनमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका आहे.


खाणकामामध्ये वापरण्यासाठी हे रेडिओ ॲक्टिव्ह कॅप्सूल एका खाणीतून दुसऱ्या खाणीत नेले जात होते, त्यावेळी पर्थमध्ये हे कॅप्सून अचानक गायब झाले. या कॅप्सूलच्या संपर्कात आल्यावर व्यक्ती होरपळून दगावू शकते किंवा त्याला अनेक आजार होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.


कसं हरवलं रेडिओॲक्टिव्ह कॅप्सूल? 


ऑस्ट्रेलियातील अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, न्यूमनच्या उत्तरेकडून वाहतुकीदरम्यान 'सीझियम-137' असलेली एक छोटी कॅप्सूल हरवली. राज्य आरोग्य एजन्सीने सांगितले की, कॅप्सूल एका ट्रकमध्ये खाणीतून स्टोरेज सुविधेमधून दुसऱ्या खाणीमध्ये नेल्या जात होत्या. यादरम्यान ही कॅप्सून गायब झाली आहे. न्यूमन पर्थच्या उत्तर-पूर्वेला अंदाजे 1,200 किमी अंतरावर आहे.


कसं गायब झालं रेडिओॲक्टिव्ह कॅप्सूल?


हे रेडिओॲक्टिव्ह कॅप्सूल आठ मिलीमीटर लांब आणि सहा मिलीमीटर रुंद आहे. रिपोर्टनुसार, ही कॅप्सूल 12 जानेवारी रोजी रिओ टिंटो लिमिटेड खाणीतून रवाना करण्यात आली होती. ही कॅप्सून पर्थ भंडारण सुविधा येथे नेली जाणार आहे. रस्त्यामध्ये धक्का लागून चुकून एखादा बोल्ट उघडल्याने ही कॅप्सूल वाटेत कुठेतरी पडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. 25 जानेवारी रोजी कॅप्सूल गायब झाल्याचे उघड झाले.


किती धोकादायक आहे 'ही' कॅप्सूल?


डिपार्टमेंट ऑफ फायर अँड इमरजेंसी सर्व्हिसेज (DFES) ने दिलेल्या माहितीनुसार, या कॅप्सूलचा हत्यार म्हणून वापर करता येणार नाही. पण यामुळे रेडीएशन पसरू शकतं, ज्यामुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हे कॅप्सूल शरीराच्या संपर्कात आल्यास त्याचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


5G नेटवर्कपासून बचाव करणारे प्रोडक्ट्सच हानिकारक, योग्य माहितीशिवाय वापरणं धोकादायक