नुकतेच महाराष्ट्रातील मराठवाड्याने गारपीट आणि अतिवृष्टी असे पावसाचे दोन्ही अनुभव घेतले आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईजवळच्या डोंबिवलीमध्ये अॅसिडचा पावसाचा अनुभव अनेकांनी घेतला. पण तुम्ही कधी माशांचा पाऊस पाहिलाय का?
आज आम्ही तुम्हाला एका अशाच देशाची माहिती देणार आहोत, जिथे गेल्या 100 वर्षांपासून चक्क माशांचा पाऊस होतो आहे. हो खरं आहे, ही काही सिनेमाची स्क्रिप्ट नाही, तर ढळढळीत वास्तव आहे. काहींना हा चमत्कार वाटेल, तर काहींना विज्ञानाचं नवं रुप.
पण मॅक्सिकोपासून जवळच असलेल्या होंडूरास नावाच्या देशात गेल्या शंभर वर्षांपासून चक्क माशांचा पाऊस होतो. या पावसामुळे रस्त्यावर माशांचा ढिग लागलेला असतो, त्यामुळे या देशातील वाहतूक नेहमी प्रभावित होते.
अशाच प्रकारचा पाऊस 20 जून 2015 रोजी आंध्र प्रदेशच्या गोलामुड्डी इथंही झाला होता. तसेच भारतापासून जवळच असलेल्या श्रीलंकेती नागरिकांनीही याचा अनुभव घेतला आहे. जेव्हा हा माशांचा पाऊस होत असतो, त्यावेळी हे दृश्य पाहण्यासारखे असते.
तज्ज्ञांच्या मते, हा पाऊस पडण्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत. समुद्रामध्ये जेव्हा जोराचे वारे वाहू लागतात, तेव्हा समुद्रात मोठमोठे भोवरे तयार होतात. या भोवऱ्यामुळे समुद्रातील छोटो मासे बाहेर फेकले जातात, आणि हे मासे किनाऱ्याजवळील शहरांवर आदळतात. यालाच माशांचा पाऊस म्हटलं जातं
पाहा व्हिडिओ