Theranos CEO Elizabeth Holmes : अमेरिकेत रक्त तपासणीच्या नावाखाली (US Blood Testing Fruad) गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारी एलिझाबेथ होम्स (Elizabeth Holmes) अखेर गजाआड गेली आहे. एलिझाबेथ होम्सने अमेरिकेत रक्त तपासणीमध्ये क्रांती घडवून आणण्याचं सांगितलं होतं. या क्रांतीच्या नावाखाली तिने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कॅलिफोर्नियातील यूएस जिल्हा न्यायाधीश एडवर्ड डेव्हिला यांनी होम्सला गुंतवणुकदारांची फसवणुक केल्याप्रकरणी तीन गुन्ह्यांमध्ये तिला दोषी ठरवलं आहे. याशिवाय आणखी एका गुन्ह्याचा कट रचल्याप्रकरणी एलिझाबेथ होम्सला शिक्षा सुनावली.


कोट्यवधींचा गंडा घालणारी 'एलिझाबेथ' अखेर तुरुंगात


न्यायालयात तीन महिने चाललेल्या खटल्यानंतर 2022 वर्षाच्या शेवटी जूरीने होम्सला दोषी ठरवलं होतं. 39 वर्षीय एलिझाबेथ होम्सला 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर आता ती तुरुंगात हजर झाली. एलिझाबेथ होम्सची शिक्षेसाठी टेक्सास येथील तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. शिक्षा सुनावल्यानंतर होम्सला न्यायालयातच रडू कोसळलं. यावेळी एलिझाबेथने आई आणि नवऱ्याला मिठी मारली. तिने सांगितलं की, तिला संधी दिली असती तर तिने अनेक गोष्टी बदलण्याचा प्रयत्न केला असता.


ब्लड-टेस्टिंग प्रकरणात गुंतवणूकदारांची फसवणूक


एलिझाबेथ होम्सने एक स्टार्टअप कंपनी सुरू केली होती. ही एक ब्लड टेस्टिंग म्हणजे रक्त तपासणी करणारी कंपन होती. होम्सने दावा केला होता की, तिने एक रक्त विश्लेषक (Blood Analyzer) म्हणजे रक्त तपासणारी मशीन विकसित केली आहे. ही मशीन कुठेही नेली जाऊ शकते, असं तिनं सांगितलं होतं. तसेच या मशिनच्या साहाय्याने रक्त तपासणी सहज शक्य होणार असा दावा तिने केला होता. या यंत्राच्या साहाय्याने बोटातून रक्त घेऊन सर्व तपासण्या करता असं होम्सनं सांगितलं होतं. यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी तिच्या स्टार्टअपमध्ये बरीच गुंतवणूक केली होती. यामुळे होम्स अल्पावधीत श्रीमंत झाली होती. पण, त्यानंतर तिचे सर्व दावे खोटे ठरले आणि तिने गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचं समोर आलं.


थेरानॉस घोटाळा प्रकरण नेमकं काय?


एलिझाबेथ होम्सनं 2003 साली ब्लड-टेस्टिंग डिव्हाईस स्टार्टअप थेरानॉस स्टार्टअप कंपनी सुरु केली. यावेळी एलिझाबेथ अवघ्या 19 वर्षांची होती. या मशीनच्या साहाय्याने रक्त तपासणीमध्ये क्रांती घडवण्याचे दावे एलिझाबेथनं केले होते. थेरानॉस यंत्र रक्ताच्या एका थेंबातून 200 (Single Drop Blood Test) हून अधिक तपासण्या करेल, असा एलिझाबेथने दावा केला होता. या 'वन ड्रॉप ब्लड टेस्ट'च्या (One Drop Blood Test) साहाय्याने अनेक रोगांचं निराकरण होईल, असंही होम्सनं सांगितलं होतं. यामुळे तिला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळाली. यामुळे ती वयाच्या 19 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनली. त्यानंतर 2018 मध्ये तिने अचानक हा स्टार्टअप बंद केला. यानंतर गुंतवणूकदारांनी न्यायालयात धाव घेतली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


US News : महिला अब्जाधीश एलिझाबेथ होम्सकडून गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक, मिळाली 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा