नवी दिल्ली : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी इमॅन्युएल मॅकराँ यांची आज निवड झाली. 39 वर्षीय मॅकराँ हे फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. पण मॅकराँ यांच्या निवडीनंतर त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या वयावरुन सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सरु  आहे. कारण या दोघांच्याही वयात तब्बल 25 वर्षांचं अंतर आहे.

सध्या फ्रान्सचे नवविर्वाचित तरुण राष्ट्राध्यक्ष इमानुएल मॅकराँ यांच्या विजयाच्या आनंदात फ्रान्सच्या जनतेसह त्यांची पत्नी ब्रिजिट ट्रॉगनेक्स मोठ्या सहभागी झाली आहे. ब्रिजिट यांच्या चेहऱ्यावर मॅकराँ यांच्या विजयाचा आनंद ओसंडून वाहत आहे. पण ब्रिजिट आणि मॅकराँ यांची लव्ह स्टोरी सध्या सर्वत्रच चर्चेचा विषय ठरली आहे. कारण मॅकराँ यांनी त्यांच्या वयापेक्षा मोठी असलेल्या महिलेशी लग्न केलं आहे. A Young Man So Prefect या फ्रान्स भाषेतील पुस्तकात मॅकराँ आणि ब्रिजिट यांची लव्ह स्टोरी दिली आहे.

मॅकराँ यांचा जन्म 21 डिसेंबर 1977 रोजी फ्रान्सच्या अमियामध्ये झाला. तर त्यांची पत्नी ब्रिजिट ट्रॉगनेक्स यांचा जन्म 13 एप्रिल 1953 रोजी याच भागात झाला. ब्रिजिट ट्रॉगनेक्स या भागातील एका खासगी शाळेत फ्रेंच आणि अभिनय या विषयाच्या शिक्षका होत्या. याशिवाय त्या एक नाटकाचा क्लबदेखील चालवत होत्या. याच शाळेत मॅकराँ शिक्षण घेत होते.

मॅकराँ फक्त 15 वर्षांचेच असताना त्यांनी आपली शिक्षिका असलेल्या ब्रिजिट यांना प्रपोज केलं. पण त्यांनी मॅकराँ यांना होकार देण्यास तब्बल 15 वर्षांचा वेळ लावला. मॅकराँ आणि ब्रिजिट यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण मॅकराँच्या कुटुंबियांना लागली. त्यानंतर मॅकराँच्या कुटुंबीयांनी दोघांनाही वेगळं करण्याचा अटोकाट प्रयत्न केला. यासाठी मॅकराँच्या कुटुंबीयांनी त्यांची शाळाही बदलली. पण तरीही त्यांच्यातील प्रेम काही कमी झालं नव्हतं.

शेवटी 2006 मध्ये ब्रिजिट यांनी आपल्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन, 2007 मध्ये मॅकराँशी लग्न केलं. मॅकराँ यांचं लग्न झालं, त्यावेळी त्याचं वय 30 वर्ष होतं. तर त्यांची पत्नी ब्रिजिट यांचं वय 54 वर्ष होतं.

मॅकराँ यांच्याकडे जेव्हा फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आली, त्यावेळी ब्रिजिटने आपलं करिअर थांबवून, मॅकराँ यांना त्यांच्या कामात मदत करु लागल्या. मॅकराँ यांची राजकीय भाषणं लिहून देण्याचं कामही ब्रिजिटच करत.

नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ब्रिजिट यांनीच मॅकराँच्या प्रचाराची सर्व जबाबदारी सांभाळली. मॅकराँ यांनीही सार्वजनिक व्यासपीठावरुन आपली पत्नी ही उत्तम सल्लागार असल्याचं वेळोवेळी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

39 वर्षीय इमॅन्युएल मॅकराँ फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष!