Dalai Lama: तिबेटचे अध्यात्मिक गुरू जगप्रसिद्ध दलाई लामा (Dalai Lama) यांच्या एका व्हायरल व्हिडीओवरून वाद निर्माण झाला आहे. सध्या दलाई लामा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका लहान मुलाचं ओठांवर चुंबन घेताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी दलाई लामा यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. 


दलाई लामा यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, दलाई लामा यांच्याजवळ एक लहान मुलगा बसलेला आहे. तो मुलगा दलाई लामा यांना मिठी मारतो. त्यानंतर दलाई लामा हे त्या मुलाच्या ओठांचे चुंबन घेतात आणि त्यानंतर दलाई लामा आपली जीभ बाहेर काढतात आणि मुलाला स्पर्श करण्यास सांगतात.' दलाई लामा यांच्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. 


दलाई लामा यांनी मागितली माफी


एनएनआय वृत्तसंस्थेनं एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये दलाई लामा यांनी व्हायरल व्हिडीओ प्रकरणी माफी मागितली आहे, असं लिहिलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. एका कार्यक्रमादरम्यान लहान मुलाने परमपूज्य दलाई लामा यांना मिठी मारता येईल का? असा प्रश्न विचारला. दलाई लामा यांच्या व्हिडीओमधील शब्दांमुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल दलाई लामा हे त्या मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची तसेच जगभरातील त्याच्या अनेक मित्रांची माफी मागू इच्छितात. दलाई लामा हे अनेकदा निष्पापपणे आणि खेळकरपणे लोकांसोबत भेटतात. ते लोकांसोबत मजा-मस्ती करत असतात, अगदी सार्वजनिक ठिकाणी आणि कॅमेऱ्यांसमोरही ते लोकांना खेळकरपणे वागतात. त्यांना या घटनेचा पश्चाताप होत आहे.'






याआधी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले होते दलाई लामा 


 2019 मध्ये दलाई लामा हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. ते म्हणाले होते की त्यांचा उत्तराधिकारी एक महिला असेल तर ती 'आकर्षक' असावी. दलाई लामा यांच्या या वक्ताव्यावर जगभरातून टीका झाली.  


महत्वाच्या इतर बातम्या : 


माझा उत्तराधिकारी भारतातून असेल, दलाई लामांना विश्वास, चीनचा जळफळाट