स्टॉकहोम (स्वीडन): यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना मिळाला आहे. व्यावहारिक अर्थशास्त्राच्या योगदानाबद्दल थेलर यांचा सन्मान करण्यात आला.

अर्थशास्त्राचं मानसशास्त्र समजून सांगणात थेलर यांचा हातखंडा आहे, त्याबद्दलही नोबेल समितीने थेलर यांची निवड केली.

1945 साली जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या 72 व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं.

आर्थिक समस्या कशा दूर करता येतील, याबाबत रिचर्ड थेलर यांनी सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे.

वैयक्तिक निर्णय क्षमतेचं आर्थिक आणि मानसशास्त्रीय विश्लेषण यांच्यातील दुवा म्हणून रिचर्ड थेलर यांचं काम मोठं आहे, असं नोबेल समितीने म्हटलं.

आर्थिक कुवत आणि मानसिक स्थिती यांच्यातील मानवी संभ्रमावस्थेबाबत रिचर्ड थेलर यांनी केलेलं विश्लेषण हे आर्थिक क्षेत्रात प्रमाण मानण्यात येतं.

यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही होते. त्यामुळे या पुरस्काराकडे देशवासियांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान, 1998 मध्ये भारताचे अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार पटकावला होता.

संबंधित बातम्या

रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

ICAN संस्थेला शांततेचा नोबेल, अण्वस्त्रविरोधी जनजागृतीचा सन्मान

अमेरिकेतील तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचं ‘नोबेल’

अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर