Longest Kiss Record : सोशल मीडियावर सध्या एका कपलची सगळीकडे चर्चा होत आहे. या कंपलने 12 वर्षांपूर्वी एक अनोखा विक्रम रचला होता. या कपलने सलग 58 तासांपेक्षा अधिक वेळ एकमेकांना किस केलं होतं. त्यांचा हा विक्रम अजूनही अबाधितच आहे. मात्र आता याच कंपलबाबत नवी माहिती समोर येत आहे. तासंतास एकमेकांना प्रेमाने किस करणारं हे कपल आता विभक्त झालं आहे. त्यांनी घटस्फोट घेतल्याचं म्हटलं जातंय. 


अजूनही विक्रम अबाधित 


 सलग 58 तास 35 मनिट एकमेकांना किस करणारं हे कपल मुळचं थायलँड देशातलं आहे. एक्काचाई तिरानारात आणि त्यांची पत्नी लकसाना यांनी 2013 साली हा विक्रम रचला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही आहे. अजूनही त्यांचा हा विक्रम अबाधित आहे. त्यांचा विक्रम अबाधित असला तरी त्याचं नातं मात्र आता तुटलं आहे. त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.  


12 वर्षांनी जोडी तुटली, रेकॉर्डवर अभिमान 


या जोडीतील एक्काचाई यांनी नुकतेच बीबीसी साऊंड्सच्या 'विटनेस हिस्ट्री' या पॉडकास्ट याबाबत त्यांच्या घटस्फोटाची पुष्टी केली आहे. 58 तास किस केलेल्याच्या रेकॉर्डवर बोलताना आम्हाला त्याचा अभिमान आहे, असंही त्यांनी म्हटलंय. आम्ही दोघांनी आमच्या जीवनातील बराच काळ सोबत घालवलेला आहे. मी त्या चांगल्या आठवणींना कायम माझ्या सोबत ठेवू इच्छितो, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.  






58 तास किस करण्याचा रेकॉर्ड कसा रचला?  


सलग 58 तास 35 मिनिटे किस करण्याचा विक्रम रचण्यासाठी या दोघांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेष म्हणजे हा विक्रम रचनाता त्यांच्यासाठी कोणताही नियम शिथील करण्यात आला नव्हता. या दोघांपैकी एका व्यक्तीला पाणी प्यायचे असेल तर त्यांनी एकमेकांना पाणी पाजले होते. झोप येऊ नये म्हणून ते एकमेकांना डोक्यावर थापा मारायचे. 58 तास किस करण्याचा रेकॉर्ड रचण्याआधी या कपलने 2011 साली त्यांनी 46 तास 24 मिनिटे किस करण्याचा विक्रम रचला होता. त्यानंतर 2013 साली त्यांनी स्वत:चाच विक्रम मोडला होता.  



हेही वाचा :


बाप IPS, लेक साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री, मात्र दुबईवरुन येताना सोन्याची तस्करी, पोलिसांच्या कचाट्यात सापडली!


Sonalee Kulkarni: ग्लॅमरस ‘अप्सरेचा’ हॉट लूक; रेड ड्रेसमध्ये दिसतेय खूपच खास!


Madhuri Dixit Is Not First Choice For Hum Aapke Hain Koun: 'हम आपके है कौन'साठी माधुरी कधीच नव्हती पहिली पसंती; तिच्याऐवजी निर्मात्यांच्या नजरेत भरलेली 'ही' अभिनेत्री, पण...