Madhuri Dixit Is Not First Choice For Hum Aapke Hain Koun: सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांची निर्मिती असलेला आयकॉनिक चित्रपट 'हम आपके है कौन' आजही प्रेक्षकांच्या काळजात घर करून आहे. या चित्रपटानं बॉलिवूडच्या दोन दिग्गजांना त्यांच्या उमेदीच्या काळात नवी ओळख मिळवून दिली. एवढंच काय तर, हा चित्रपट दोघांच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला आहे. सलमान खान (Salman Khan) आणि माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) चित्रपटात या जोडीला खूप पसंती मिळाली. निशाच्या भूमिकेत प्रेक्षकांना माधुरी खूप आवडली. पण, तुम्हाला माहिती आहे का? खरं तर 'हम आपके है कौन'साठी माधुरी दीक्षित फर्स्ट चॉईस कधीच नव्हती. यापूर्वी सूरज बडजात्यानं निशाच्या भूमिकेसाठी दुसऱ्याच अभिनेत्रीची निवड केली होती. आणि त्या अभिनेत्रीचं नाव ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.


'ही' अभिनेत्री साकारणार होती 'हम आपके है कौन'ची 'निशा'


निर्मात्यांना 'हम आपके हैं कौन' या चित्रपटासाठी सलमान खानसोबत करिश्मा कपूरला साईन करायचं होतं. सूरजनं करिश्माचा 'प्रेम कैदी' हा चित्रपट पाहिला होता, ज्यामध्ये त्याला तिचं काम खूप आवडलं होतं. अशा परिस्थितीत, सूरज बडजात्याला करिश्माला त्यांच्या चित्रपटात कास्ट करायचं होतं. पण शेवटी, करिश्माऐवजी, माधुरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली आणि याचं कारण सूरजचे वडील राजकुमार बडजात्या होते.






करिश्माला पसंती, पण माधुरीला कसा मिळाला 'हम आपके है कौन'?


निर्माते सूरज बडजात्या यांनी स्वतः एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, ज्यावेळी त्यांनी करिश्मा कपूरला फिल्ममध्ये घेण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या वडिलांना सांगितला, त्यावेळी त्यांच्या वडिलांनी स्पष्ट नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की, करिश्माचं वय अजून फारच कमी आहे. त्यामुळे तिच्याऐवजी दुसऱ्या कुणाला तरी 'हम आपके है कौन'साठी कास्ट करावं. त्यानंतर माधुरीला 'हम आपके है कौन' मिळाला, त्यावेळी माधुरी दीक्षित टॉपची अभिनेत्री होती. असंही म्हटलं जातं की, या फिल्ममध्ये माधुरीनं सलमान खानपेक्षा जास्त फी घेतली होती.   


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


बाप IPS, लेक साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री, मात्र दुबईवरुन येताना सोन्याची तस्करी, पोलिसांच्या कचाट्यात सापडली!