Tesla CEO Elon Musk : टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आपल्या नव्यानं लाँच झालेल्या 'बर्न हेअर परफ्यूम' (Burnt Hair Perfume) ची जाहिरात करताना पुन्हा एकदा ट्विटरवर (Twitter) धुमाकूळ घातला आहे. एलॉन मस्कनं गुरुवारी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर आणखी एक नवं ट्वीट केलं. जे व्हायरल होत असून नेटकरी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एलॉन मस्कनं ट्वीट करत पुन्हा एकदा ट्विटर (Twitter) युजर्सना आवाहन केलं आहे. तसेच, मदत मागितली आहे. तुम्ही केलेल्या मदतनंतर मी ट्विटर खरेदी करु शकतो, असं मस्कनं म्हटलं आहे. एलॉन मस्कनं ट्वीट केलं आहे की, "कृपया माझे परफ्यूम खरेदी करा जेणेकरून मी ट्विटर खरेदी करू शकेन." 


एलॉन मस्क नेहमी काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. अनेकदा ते आपल्या ट्विटर हँडलवरुन हटके आणि मजेशीर ट्वीट करत असतात. अलिकडे त्यांची ट्विटर डील चर्चेत आहे. त्यांनी आधी ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली, नंतर ही ट्विटर डील कॅन्सल झाली. त्यानंतर आता पुन्हा मस्क ट्विटर खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. एलॉन मस्क यांचं ट्वीट अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.






एलॉन मस्कनं ट्विटरचा बायोही बदलला 


एलॉन मस्कनं बुधवारी ट्विटरवर त्याचा परफ्यूम ब्रँड लॉन्च करण्याची घोषणा केली. एलॉन मस्कनं परफ्यूम ब्रँड लॉन्च केल्यानंतर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. एलॉन मस्क एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी आपला ट्विटर बायोही बदलला. एलॉन यांनी 'परफ्यूम सेल्समन' असं  आपल्या बायोमध्ये लिहिलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलॉन मस्क यांच्या परफ्यूमची किंमत ₹ 8,400 (USD 100) आहे आणि त्याचा गंध 'द एसेन्स ऑफ रिपेंट डिझायर' सारखा आहे.


एलन मस्क यांच्या कंपनीचा 'बर्न्ट हेअर परफ्यूम' चर्चेत 


बर्न्ट हेअर परफ्यूम (Burnt Hair Perfume) 'द बोरींग कंपनी' (The Boring Company) या ब्रँडचा आहे. 'द बोरींग कंपनी' ही एलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे. 'द बोरींग कंपनी' अमेरिकन टनल बनवणारी कंपनी आहे. दरम्यान, ही कंपनी एलॉन मस्क यांच्या मालकीची आहे. या कंपनीनं एक परफ्यूम लाँच केला आहे. या परफ्यूमची जाहिरात करण्यासाठी एलॉन मस्क यांनी नवा मार्ग शोधला आहे. म्हणून त्यांनी स्वत:ला परफ्यूम सेल्समन म्हटलं आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला परफ्यूम विक्रेता, एलॉन मस्क बनले सेल्समन, कारण काय?