काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानींच्या सत्तेनंतर आता अफगाणिस्तान क्रिकेटचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (ACB) मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी यांनी म्हटले की, क्रिकेटचं कोणतंही नुकसाना होणार नाही. तालिबानी क्रिकेट खेळ आवडतो आणि ते या खेळाला पाठिंबा देतील. काबूलहून पीटीआयशी बोलताना शिनवारी यांनी आश्वासन दिले की राष्ट्रीय संघातील सदस्य आणि त्यांचे कुटुंबिय सुरक्षित आहेत. 


रशीद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब जादरानसारखे स्टार खेळाडू सध्या ब्रिटनमध्ये 'हंड्रेड' स्पर्धेत खेळत आहेत. शिनवारी यांनी म्हटलं की, तालिबान्यांना क्रिकेट आवडते. त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला आहे. ते आमच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. आमचे अध्यक्ष सक्रिय आहेत आणि पुढील सूचना येईपर्यंत मी मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. 


अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीचा भयावह व्हिडीओ! जीव वाचवण्यासाठी विमानाला लटकलेल्या दोघांचा पडून मृत्यू


शिनवरी यांनी पुढे म्हटलं की, असं म्हटलं जाऊ शकते की तालिबानच्या काळात अफगाणिस्तानात क्रिकेटची भरभराट झाली. हे देखील एक सत्य आहे की आमचे बरेच खेळाडू पेशावरमध्ये सराव करायचे आणि त्यांनी हा खेळ अफगाणिस्तानमध्ये मुख्य प्रवाहात आणला.


Afghanistan : जगात चिंतेचे वातावरण असताना चीनचा तालिबानकडे मैत्रीचा हात


चांगली गोष्ट म्हणजे इथे स्थिती सामान्य होत आह. लोकांनी कामाला सुरुवात केली आहे. आम्ही उद्यापासून आमच्या कार्यालयात पुन्हा काम सुरू करू आणि श्रीलंकेतील पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राष्ट्रीय शिबिर पुन्हा सुरू होईल. परदेशात खेळणारे चार पाच खेळाडू वगळता इतर खेळाडू काबूलमध्ये आहेत आणि ते सुरक्षित आहेत, अशा शिनवरी यांनी सांगितलं.


Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला


इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर राशिद खान आपल्या देशातील परिस्थितीबद्दल खूप चिंतित आहे आणि तो आपल्या कुटुंबाला तेथून बाहेर काढू शकत नाही. आम्ही याविषयी दीर्घ चर्चा केली आहे आणि रशीद खान याबद्दल खूप चिंतित आहेत. तो आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानातून बाहेर काढू शकत नाही आणि हा त्याच्यासाठी एक अतिशय कठीण काळ आहे.