काबुल : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती काही भयावह बनत आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. नागरिक देश सोडून जाण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मिळेल त्या मार्गाने नागरिकांना देशातून म्हणजेच तालिबान्यांच्या तावडीतून बाहेर पडायचं आहे. रस्त्यांवर लोकांची गर्दी आहे. विमानतळावर विमानांच्या अवतीभोवती नागरिकांना गर्दी केलीय. अशातचा विमानाला लटकून प्रवास करण्याच्या प्रयत्नात हवेतून खाली पडून काही जणांना मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 


काबुल विमानतळावर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखीच चिघळली आहे. काबुल विमानतळ एकमेव मार्ग आहे जिथून लोक देश सोडून बाहेर जाऊ शकतात. त्यामुळेच मोठ्या संख्येने लोक तिथे जमले आहेत. येथील भयावह स्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. विमानात जागा नाही म्हणून लोक रेल्वे, बसला जसं लटकावं तसं विमानाला लटकताना दिसत आहेत. काही लोकांनी विमान टेक ऑफ घ्यायच्या आधी विंगमध्ये बसून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. विमान ज्यावेळी हवेत होतं, त्यावेळी काही जणांना खाली पडून मृत्यू झाल्याचं व्हिडीओतून दिसत आहे. तालिबान्यांच्या तावडीतून सुटकेसाठीचा हा नागरिकांचा आटापिटा आहे. 


Afghanistan : परिस्थिती चिघळणार? काबुल एयरपोर्टवर अमेरिकन सैन्याचा गोळीबार, पाच जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी



अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनींनी देश सोडला


जेव्हा देशाचे राष्ट्रपती देश सोडून गेले, तेव्हा तेथील सामान्य लोकांच्या स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी रविवारी देश सोडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपल्या कोअर टीमसह ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील सामान्य लोकांच्या स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. अशरफ घनी यांनी रविवारी देश सोडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या कोअर टीमसह ताजिकिस्तानमध्ये आश्रय घेतला आहे.


Afghanistan : 25 वर्षापूर्वीचा काळा इतिहास; तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेह खांबावर लटकवला


काबुलमध्ये 130 भारतीय उपस्थित 


तालिबानच्या ताब्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात आहे. दरम्यान 130 भारतीय काबुलमध्ये उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. त्यात भारतीय राजदूत आणि संरक्षण खात्यासह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्र सरकार आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी अमेरिकेशी सतत चर्चा करत आहे. काबुलमध्ये उपस्थित भारतीयांना लवकरात लवकर परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारताकडून काबुलमध्ये पाठवण्यासाठी दोन विमाने आज सज्ज करण्यात आली होती. मात्र दोन्ही विमाने रद्द केल्याची माहिती मिळत आहे.