Skin Care Tips : चेहऱ्यावर ऑइल जमा झाल्याने अनेक वेळा पिम्पल्स येतात. चेहऱ्यावरील फोड घालवण्यासाठी लोक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात तसेच वेगवेगळे फेस पॅक आणि फेस वॉशचा वापर चेहऱ्यावरील पिम्पल्स घालवण्यासाठी काही जण करतात. बाजारात किंवा ऑनलाइन मिळणाऱ्या काही ब्यूटी प्रोडक्ट्सचा वापर केल्याने स्किनवर रॅश येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला चेहऱ्यावरील फोडं घालवायची असतील तर हे टोनर नक्की ट्राय करा. जाणून घ्या होममेड टोनर तयार करण्याची सोपी पद्धत-
टोनरचा वापरटोनरचा वापर स्किन स्वच्छ करण्यासाठी तसेच स्किनवरील पोर्स ओपन करम्यासाठी केला जातो. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही दररोज टोनरचा वापर केला पाहिजे.
गुलाब पाण्याचे टोनर गुलाब पाण्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन टाका.या मिश्रणाला 15 दिवस प्रिजर्व्ह करा. त्यानंतर त्यामध्ये अॅप्पल सायडर व्हिनेगर टाका. तुमचे टोनर तयार आहे. हे टोनर दिवसातून तीन वेळा चेहऱ्यावर कापसाने लावा.
नीम टोनरकडुलिंबाची पाने पाण्यात उकळा. हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये ओता. त्यामध्ये आर्धा चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर टाका. या टोनरमुळे तुमच्या चेहऱ्यावरील फोडं निघून जातील. हा टोनर दिवसातून तीन ते चार वेला चेहऱ्यावर लावा.
चेहऱ्यावर हळद आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने देखील चेहऱ्यावर ग्लो येतो. तसेच मुलतानी माती गुलाब पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला फेस पॅक म्हणून लावू शकता. या पॅकमुळे तुमच्या स्किनवर ग्लो येतो आणि चेहऱ्यचा तेलकटपणा देखील कमी होतो.
(टीप- एबीपी माझाच्या लेखात दिलेली माहिती फक्त सूचना म्हणून सांगण्यात आलीय. अशा प्रकारचा कोणताही उपचार, औषध किंवा आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या-
Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात तुमच्या आहारात करा 5 बदल, झटपट कमी होईल वजन
Tea Side Effects: दिवसातून चार कप चहा पिताय? तर सावधान, होऊ शकतं नुकसान