Weight Loss: पोहे, इडली, दलिया, अंड आणि डोसा असे पदार्थ  अनेकांना ब्रेकफास्टमध्ये (breakfast) खायला आवडतात. वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर ब्रेकफास्टकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. काही पदार्थ सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाल्याने तुमचे वजन वाढू शकते. जाणून घेऊयात कोणते पदार्थ खाल्याने वजन वाढते- 


सकाळी ब्रेकपास्टसोबत लोक कॉफी किंवा चहा पितात. पण चहा आणि कॉफीमध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त असते. कॅफेन युक्त पेय प्यायल्याने  डीहाइड्रेशन होते. त्यामुळे  ब्रेकफास्ट करताना कॉफी किंवा चहा पिणे टाळा. 


फ्रूट ज्यूस- मार्केटमध्ये मिळणारे फ्रूट ज्यूस सकाळी ब्रेकफास्ट करताना  पिणे टाळावे. ज्यूसमध्ये  फायबर नसते. त्यामुळे ब्रेकफास्ट करताना ज्यूस प्यायल्याने काही वेळेतच तुम्हाला भूक लागू शकते. तसेच मार्केटमध्ये मिळणाऱ्या पॅक ज्यूसमध्ये खूप कमी पोषक त्यामुळे तुम्ही ज्यूस ऐवजी केळी, सफरचंद आणि पेरू या फळांचा समावेश ब्रेकफास्टमध्ये करू शकता. 


ब्रेकफास्टमध्ये गोड पदार्थ खाणे टाळा
ब्रेकफास्टमध्ये गोड पदार्थ खाल्याने तुमच्या शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते. तसेच गोड पदार्थ खाल्याने पोट आणि लिव्हरमध्ये फॅट्स जमा होते. 


केक, कुकीज- केक आणि कुकीज या पदार्थांमध्ये मैदा आणि तूप असते. तसेच केक आणि कुकीज तयार करताना क्रिमचा देखील वापर केला जातो. त्यामुळे केक आणि कुकीज खाल्याने वजन वाढू शकते. म्हणून ब्रेकफास्टमध्ये केक आणि कुकीज खाणे टाळा.


(टीप- एबीपी माझाच्या लेखात दिलेली माहिती फक्त सूचना म्हणून सांगण्यात आलीय. अशा प्रकारचा कोणताही उपचार, औषध किंवा आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)


संबंधित बातम्या-


Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात तुमच्या आहारात करा 5 बदल, झटपट कमी होईल वजन


Tea Side Effects: दिवसातून चार कप चहा पिताय? तर सावधान, होऊ शकतं नुकसान


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित