Google News : गूगलचे सीईओ सुंदर पिचाई (sundar pichai) हे इंस्टाग्रामवर नेहमी अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळ्या पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतेच सुंदर पिचाई यांनी लंडन येथील गूगल कंपनीच्या ऑफिसचे फोटो सोशल मीडियार शेअर केले आहे. लंडनमधील सेंट्रल सेंट गेल्समधील गूगलच्या या ऑफिसमध्ये लग्झरी सुविधा आहेत तसेच ऑफिसच्या बिल्डींगमध्ये रेस्टॉरंट आणि कॅफे देखील आहे.
सुंदर पिचाई यांनी ऑफिसचे फोटो शेअर करून माहिती दिली की, या ऑफिसमध्ये एकूण 10,000 कर्मचारी काम करू शकतात. लंडनमधील या ऑफिसमध्ये सध्या 7,000 कर्मचारी काम करत आहेत. गूगल कंपनीनं हे ऑफिस 7500 कोटी रूपयांना खरेदी केले आहे. या ऑफिस बरोबरच गूगलचं मॅनचेस्टर येथे देखील ऑफिस आहे.
गुगलच्या चीफ फायनान्शिअल ऑफिसर रुथ पोराट यांनी ऑफिसबद्दल सांगितलं, 'गेल्या 20 वर्षांपासून लंडन येथे काम केल्याबद्दल आम्हाला खूप आभिमान वाटतो. ' गेल्या वर्षी, सप्टेंबर महिन्यामध्ये गूगलने न्यूयॉर्कमधील व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मॅनहॅटन येथील सेंट जॉन टर्मिनल विकत घेतले.
इतर बातम्या :
Telangana Silk Sarees : माचिसच्या पेटीत मावते 'ही' सिल्क साडी, तेलंगणाच्या विणकराची कामगि
The Yamazaki : 'हौसेला मोल नाही'; पठ्ठ्यानं घेतली 4 कोटींची 55 वर्ष जुनी व्हिस्की
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha