Sri Lanka Supreme Court Latest Order : श्रीलंकेतील आर्थिक संकट आणखी चिघळल्याचं दिसत आहे. गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देश सोडून पळून जात राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशातील जनता फारच संतप्त झाली आहे. श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयात गोटाबाया यांचे बंधू माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे आणि इतर उच्च अधिकाऱ्यांच्या देश सोडण्यावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी देत न्यायालयाने गोटाबाया यांचे भाऊ माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) आणि माजी मंत्री बेसिल राजपक्षे (Basil Rajapaksa) यांना देश सोडण्यास बंदी घातली आहे.


श्रीलंकन डेली मिररच्या वृत्तानुसार, श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाने  (Sri Lanka Supreme Court) महिंदा राजपक्षे आणि बेसिल राजपक्षे यांना 28 जुलैपर्यंत न्यायालयाच्या आदेशाशिवाय देश सोडण्याची परवानगी नाही. न्यायालयाने राजपक्षे बंधूच्या देश सोडण्यावरील बंदीचा अंतरिम आदेश जारी केला आहे. एका दिवसापूर्वीच गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे.




देश सोडण्याच्या तयारीत होते बेसिल राजपक्षे
मीडिया रिपोर्ट्नुसार, माजी मंत्री बेसिल राजपक्षे (Basil Rajapaksa) देश सोडण्याच्या तयारीत होते. महिंदा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) आणि बेसिल राजपक्षे गोटाबाया राजपक्षे यांचे भाऊ आहेत. गोटाबाया यांनी देश सोडल्यानंतर देशातील जनतेचा राग अनावर झाला आहे. त्यामुळे राजपक्षे बंधूंच्या देश सोडण्यावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.


गोटाबाया राजपक्षे यांनी ईमेलद्वारे दिला राजीनामा
गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आहे. गोटाबाया यांनी आपला राजीनामा ई-मेलद्वारे श्रीलंकन संसदेच्या अध्यक्षांना पाठवला आहे. गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडला आणि ते मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते सिंगापूरला पोहोचले.


महत्त्वाच्या इतर बातम्या