Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे ( Sri Lanka President Gotabaya Rajapaksa) हे मालदीवहून (Maldives) सिंगापूरला (Singapore) जाणार असल्याचं वृत्त होतं. पण आता ते सिंगापूरमार्गे सौदी अरेबियाला (Saudi Arebis) जाणार असल्याचं वृत्त असोसिएट प्रेसनं (Associated Press) दिलं आहे. असोसिएट प्रेसने मालदिवमधील अज्ञात अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं मिळालेल्या माहितीनुसार सांगितलं आहे की, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे मालदीवहून सिंगापूरमार्गे सौदी अरेबियाला जाणार आहे. गोटाबाया सौदी अरेबियन एअरलाईने प्रवास करणार असल्याचं वृत्त असोसिएट प्रेसनं दिलं आहे.


बुधवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून मालदीवमध्ये आश्रय घेतला असल्याचं वृत्त समोर आलं. त्यानंतर ते सिंगापूर जाणार असल्याची माहिती मिळाली. तर आता गोटाबाया सिंगापूरमार्गे सौदी अरेबियाला जाणार असल्याचं वृत्त आहे. गोटाबाया यांनी देश सोडल्यानंतर श्रीलंकन जनतेनं जोरदार निर्दशिनं केली. यामध्ये सुमारे 84 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जनतेकडून राष्ट्रपती गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी होतं आहे. गोटाबाया यांनी 13 जुलै रोजी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र राजीनामा देण्याआधी त्यांची पळापळ सुरु आहे. 


आंदोलकांचा राष्ट्रपती आणि पंतप्रधान निवासावर मुक्काम
जनतेकडून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. निदर्शनं करत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर तळ ठोकला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावरच मुक्काम केला असून जोपर्यंत ते त्यांच्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत निवासस्थान सोडणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.