Sri Lanka Crisis : श्रीलंकेचे पंतप्रधान (Sri Lanka PM Resigns )  महिंद्रा राजपक्षे (Mahinda Rajapaksa) यांनी राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपुर्द  केला आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्याकडून राजीनामा अद्यापही स्विकारण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पंतप्रधान कार्यलयाकडून राजीनामाचे वृत्त फेटाळण्यात आले आहे. राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असून त्याच कोणतेही तथ्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. सरकार आणि राजकीय पक्षांमध्ये तत्काळ राजकीय स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी राजीनामा दिल्याचं सांगण्यात आले आहे. 


श्रीलंका सध्या इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे.  इंधन, स्वयंपाकाचा गॅस, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि तासनतास वीज खंडित झाल्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत श्रीलंकातील परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आहे. या विरोधात नागरिकांकडून ठिकठिकाणी  निदर्शने करण्यात आली आहे.  राष्ट्रध्यक्षांच्या घराबाहेर देखील निषेध करण्यात आली आहे. 


 श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने याच्याकडून देखील पत्रक जारी करत आर्थिक परिस्थिती बिघडल्यासंदर्भात भाष्य करण्यात आले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या काही लोकांनी जनतेचा विश्वास गमावल्याने त्यांनी सत्तेवरुन खाली उतरावे, असे वक्तव्य महेला जयवर्धने यांनी केले आहे.  श्रीलंकेतील समस्या मानवनिर्मित असून योग्य आणि पात्र लोकांकडून त्याचे निराकरण केलं जाऊ शकतं असं म्हणत सोशल माध्यमात पत्रक जारी केले आहे. 


देशात इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई 
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी 1 एप्रिलपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा करणारी अधिसूचना जारी केली आहे. जनता स्त्यावर उतरल्याने सरकारला हा मोठा निर्णय घ्यावा लागला. जनता संतप्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील इंधन आणि गॅसची तीव्र टंचाई आहे. श्रीलंका सरकारकडे तेल आयात करण्यासाठी परकीय चलनाच्या साठ्याची मोठी कमतरता आहे. त्यामुळे नागरिकांना पेट्रोल, डिझेलसाठी अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे.


पेट्रोलपेक्षा दूध महाग
देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे की, शिक्षण खात्याकडील कागद आणि शाई संपली आहे. त्यामुळे परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. वीजपुरवठाही खंडित झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे येथे पेट्रोलपेक्षा दूध महाग झाले आहे.


संबंधित बातम्या : 


Sri Lanka Crisis : श्रीलंकेत 36 तास कर्फ्यू, सोशल मीडिया साइट्सवर बंदी; जाणून घ्या 10 महत्वाचे मुद्दे




 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha