Sri Lanka Economic Crisis : श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. याचा देशाच्या राजकारणावर मोठा परिणाम झाला आहे. जनतेकडून राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. जनता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. आंदोलक जनतेनं जोरदार निदर्शनं करत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर तळ ठोकला आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावरच मुक्काम केला असून जोपर्यंत ते त्यांच्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत निवासस्थान सोडणार नसल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.


राष्ट्रपति गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मात्र तरीही जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रपती आणि पंतप्रधान राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांच्या निवासस्थानावरच तळ ठोकून बसणार असल्याची आंदोलकांची भूमिका आहे. देशातील आर्थिक परिस्थितीमुळे संतप्त आंदोलकांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला. कोलंबोमधील सचिवालयाबाहेरही नागरिकांची निदर्शनं सुरुच आहेत. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.






 






राष्ट्रपती भवन बनलं पर्यटन स्थळ
कोलंबोमधील राष्ट्रपती भवन हे पर्यटन स्थळ बनले आहे. संतप्त आंदोलक निवासस्थानाचा ताबा घेतला आहे. आंदोलक बाल्कनीत फेरफटका मारत, बेडरूममध्ये आराम करत, स्वयंपाकघरात जेवण करणं आणि स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेत आहेत.






राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान यांनी सांगितले आहे की, 13 जुलै रोजी पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. पण जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही त्यामुळे जोपर्यंत राजीनामा नाही तोपर्यंत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे निवासस्थान सोडणार नसल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या