Spanx company founder Sara Blakely surprised employees: दिवाळी सणाला लवकरच सुरूवात होणार आहे. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून दिवाळी गिफ्ट आणि बोनस देखील मिळतो. पण जर तुमच्या कंपनीने 10 हजार युएस डॉलर्स (7 लाख 49 पेक्षाजास्त) आणि जगभरात कुठेही जाण्यासाठी दोन विमानाची तिकीटं दिली तर? अनेकांना हे स्वप्नासारखे वाटत असेल पण कर्मचाऱ्यांना स्वप्नासारखं वाटणारं हे गिफ्ट नुकतच अमेरिकन कंपनीने देण्याचा निर्णय घेतला आहे.  स्पॅनक्स या अमेरिकन कंपनीच्या  संस्थापिका सारा ब्लेकली यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा या सर्वात तरुण महिला अब्जाधीश ठरल्या आहेत. 


स्पॅनक्स ही अमेरिकन कंपनी शेपवेअर प्रोडक्ट्स  कंपनी आहे. या कंपनीला झालेल्या आर्थिक फायद्यामुळे कंपनीमध्ये काम करणाऱ्या स्टाफला जगाभरात कुठेही फिरण्यासाठी फर्स्ट क्लासची दोन विमान तिकीटे आणि 10 हजार डॉलर्स देण्याचा निर्णय कंपनीच्या संस्थापिका यांनी घेतला आहे. कंपनीच्या  500 कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पार्टीमध्ये त्यांनी या गिफ्टबद्दल घोषणा केली. या पार्टीमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा त्यांच्या या घोषणेनंतर सर्व कर्मचारी आनंदीत झाले आहेत.  


बँकेत मास्क घालायची विनंती केल्याने 5.8 कोटी रुपयांच्या नोटा काढल्या अन् बँकवाल्यांना मोजायला लावल्या





व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये साराने ब्लेकली यांनी सांगितले की, 'मी एक दिवस कंपनी 20 मिलियन अमेरिकी डॉलरची होईल असे सांगितले होते, तेव्हा अनेक लोक माझ्यावर हसले होते. आता कंपनी कुठे आली आहे ते पाहा.' स्पॅनक्सनीच्या लोकांना जेव्हा विमान तिकीटाबद्दल विचारण्यात आले तेव्हा काहींनी हनीमूनला जाणार असल्याचं सांगितलं तचर काहींनी  दक्षिण आफ्रिकेची सफर करण्याबाबत सांगितलं. स्पॅनक्स कंपनीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या मनात 'असा बॉस सर्वांना हवा', असा विचार नक्कीच आला असेल.


No Shave November: नो शेव्ह नोव्हेंबरला काहीच दिवस शिल्लक, तरूणांमध्ये उत्सुकता