No Shave November: नोव्हेंबर महिना हा सोशल मीडियाच्या जगात ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ (No Shave November) म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर महिना सुरू होताच अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये 'नो-शेव्ह नोव्हेंबर'ची चर्चा सुरू होते. मात्र, अनेकजणांना या महिन्याबाबत योग्य माहिती नाही. नो शेव्ह नोव्हेंबरचा महत्व आणि माहिती जाणून घेण्यासाठी अनेकजण गुगलवर भेट देतात. दरम्यान, नोव्हेबर महिन्यात शेव्ह का केली जात आहे? यामागचे नेमके उदिष्ट काय? याची संपूर्ण माहिती तुम्हाला खालील लेखात देण्यात आली आहे. 


PHOTO : World Sight Day चा इतिहास आणि महत्व काय?


नो शेव्ह नोव्हेंबर ही मोहीम मनोरंजन किंवा स्पर्धा म्हणून राबवली जात नाही. ही मोहीम कर्करोगाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राबवली जाते. ही संकल्पना अमेरिकास्थित मॅथ्यू हिल फाउंडेशनची आहे. ही संस्था कर्करोगाविषयी जागरूकता वाढवण्याच्या दिशेने काम करते. 'नो-शेव्ह नोव्हेंबर' हा देखील या मोहिमेचा एक भाग आहे. हिल फाउंडेशनच्या वेबसाइटनुसार, कर्करोगाच्या उपचारादरम्यान रुग्णांचे केस गळतात. त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नो-शेव्ह नोव्हेंबर 2009 पासून साजरा केला जात आहे. या मोहिमेंतर्गत नोव्हेंबरचा संपूर्ण महिना दाढी केली जात नाही. 


नो-शेव नोव्हेंबर'चे ध्येय कर्करोगाविषयी जागरूकता पसरवणे आणि कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत करणे आहे. लोकांना शेव्हिंगचे पैसे वाचवण्यासाठी आणि फाउंडेशनला दान करण्यास सांगितले जाते. हे पैसे कर्करोगग्रस्तांची काळजी घेण्यासाठी खर्च केले जातात. मॅथ्यू हिल फाउंडेशन ही एक अमेरिकन खाजगी संस्था आहे. या संस्थेने नो शेव्ह नोव्हेंबर' च्या माध्यमातून 5 दशलक्ष डॉलर्सची देणगी जमा केली आहे. जी कर्करोगाच्या संशोधनावर खर्च करण्यात येते. कर्करोगामुळे आज जगभरात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. त्यामुळे त्याच्या उपचारांबाबत संशोधनासोबतच लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे, असे मॅथ्यू हिल फाउंडेशन संस्थापकांचे मत आहे. 


इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या आकडेवारीनुसार, भारतात 2020 पर्यंत कर्करोगामुळे आठ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतात स्तनाचा कर्करोग, मुखाचा कर्करोग, आणि फुफ्फुस कर्करोगाचे रुग्ण 41 टक्के आहे. जिथे पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण खूप जास्त आहे, तिथे महिलांना स्तनाच्या कर्करोगाने घेरले आहे.