टोक्यो :  प्रेम पैशाच्या तराजूत तोलता येत नाही असं म्हणतात, हेच जपानच्या राजकुमारीनं  सिद्ध करुन दाखवल आहे. सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत जपानची राजकुमारी माकोनं तिच्या कॉलेज प्रियकराशी लग्न केले आहे.  सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत जपानची राजकुमारी माको हीनं तिच्या कॉलेज प्रियकराशी लग्न केलंय. केई कोमुरो असं तिच्या प्रिकराचं नाव आहे. विशेष म्हणजे राज घराण्याबाहेर लग्न केल्यानंतर राजेशाही पदवी राजघराण्याला देण्याच्या मोबदल्यात साडे सात कोटी रुपये देण्यात येतात. मात्र जपानच्या राजकुमारीनं तेही घेण्यास नकार दिला आहे.


राजकुमारी माकोचा भाऊ हिसाहितो हा सिंहासनाचा पुढचा वारसदार असणार आहे. यापुढे माको आणि केई कुमरो हे न्यूयॉर्कमध्ये स्थायिक होणार आहेत. जपानच्या शाही कुटुंबातील सदस्य इतर देशांमध्ये प्रवास करण्यासाठी पासपोर्टऐवजी डिप्लोमॅटिक कार्ड वापरतात. मात्र पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज करणारी माको ही जपानच्या राजघराण्यातील पहिली व्यक्ती असणार आहे. राजघराण्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या इम्पीरियल हाउसहोल्ड एजन्सीने (आयएचए) स्थानिक विवाह कार्यालयात त्यांच्या लग्नाची नोंदणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण कागदपत्रे सादर केल्यानंतर राजकुमारी आणि तिच्या प्रियकराच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आली.


माको आणि तिचा 30 वर्षीय प्रियकर कोमूरोने 2017 साली आपल्या साखपुड्याची घोषणा केली.  त्यानंतर राजकुमारीच्या प्रियकराचा परिवार आर्थिक संकटाशी सामना करत असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर कोमुरो कायद्याचे पुढील शिक्षण घेण्यासाठी 2018 साली अमेरिकेला गेले. सध्या कोमुरो एका लॉ फर्ममध्ये काम करत आहे.


कोमुरो गेल्या महिन्याच जपानला परतला आहे. जेव्हापासून कोमुरो  जपानला आला तेव्हापासून तो चर्चेत होता.  राजकुमारीची होणारी सासू म्हणजे कोमुरोच्या आईचे नाव एका पैशाच्या घोटाळ्यात समोर आल्यानंतर नागरिकांनी पूर्णपणे समर्थन दिले नाही. यामुळे राजकुमारीला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले, त्यामुळे तिच्या लग्नासाठी उशीर झाला आहे. 


जपानच्या शाही परिवाराच्या नियमानुसार परिवारातील एखादी महिला सदस्याने शाही परिवाराशी लग्न न करता सामान्य नागरिकाशी विवाग केला तर तिचे राजकुमारी पद संपुष्टात येते. एवढचं नाही तर तिला आपल्या परिवाराला देखील सोडावे लागते. जपनाच्या युद्धानंतर इतिहासात पहिल्यांदाच माकोने  रक्कम  घेण्यास नकार दिला आहे.