Death Sentence अंमली पदार्थांची तस्करी (Drugs Smuggling) रोखण्यासाठी जगभरातील विविध देशांमध्ये अतिशय कठोर कायदे करण्यात आले आहेत. त्यातच अंमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यात सिंगापूरमध्ये (Singapore) भारतीय वंशाच्या नागरिकाला फाशीची शिक्षा (Death Sentence) देण्यात आली.


सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या 46 वर्षीय तंगाराजू सुपय्या नावाच्या नागरिकाला अंमली पदार्थांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा देण्यात आली. या भारतीय वंशाच्या नागरिकाने एक नाही, दोन नाही तर तब्बल नऊ वर्षांचा तुरुंगवास सिंगापूरच्या तुरुगांत भोगला. नऊ वर्षांच्या तुरुगांवासानंतर बुधवार 26 एप्रिल रोजी त्याला फाशीचा शिक्षा देण्यात आली. 


सिंगापूर तरुगांतील अधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना माहिती देताना सांगितले की, "तंगाराजू सुपय्या या आरोपीला सिंगापूरच्या चांगी तुरुंगात फाशी देण्यात आली." तंगराजू सुपय्या याची फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी अशी दयेची याचिका सिंगापूरच्या राष्ट्रपती हलीमा याकूब यांच्याकडे करण्यात आली होती. परंतु राष्ट्रपतींनीही याचिका फेटाळली. 


तंगाराजू सुपय्याला फाशी का?


अंमली पदार्थांचं सेवन करणं आणि ड्रग्जची तस्करी करण्याच्या आरोपाखाली तंगराजू सुपय्या याला 2014 मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला सिंगापूरहून एक किलो गांजाची तस्करी करण्याच्या आरोपात 9 ऑक्टोबर 2018 रोजी त्याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आज 26 एप्रिल 2023 रोजी या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली.


सिंगापूरमध्ये सर्वात कठोर कायदे


जगातील इतर देशांच्या तुलनेत सिंगापूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात खूप कठोर कायदे आहेत. यावर सिंगापूरच्या प्रशसानाचे असे म्हणणे की देशात अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी कठोर कायदे करणं गरजेचे आहे. सिंगापूरचं असं देखील म्हणणं आहे की, "अंमली पदार्थ ही दक्षिण पूर्व आशियातील देशामधील प्रमुख समस्या आहे." तथापि तंगाराजूचे प्रकरण तितके संशयास्पद वाटत नाही जेवढं ते दाखण्यात आलं आहे. 


तंगाराजूला फाशीची शिक्षा दिल्याने जगभरातून यावर टीका केली जात आहे. तसंच प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. याशिवाय सिंगापूरने एका निर्दोष तरुणाला फाशी दिली असं  काही प्रसिद्ध व्यक्तींनी म्हटलं आहे. 


कोर्टाने देखील केले दुर्लक्ष


काही वृत्तानुसार, पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीच्या आधारावर भारतीय वंशाचा नागरिक तंगाराजू सुपय्याला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. परंतु पोलीस तपासावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. पोलिसांनी तंगाराजूला एक वकील आणि तामीळ भाषेचे भाषांतर करणारा अनुवादक दिला नाही, असा आरोप पोलिसांवर होत आहे. या दोन्हीही गोष्टींची मागणी तंगाराजूने पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी तंगाराजूच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले असल्याचं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह आता उपस्थित केले जात आहे. 


संबंधित बातमी 


Death Sentence : भारतीय वंशाच्या नागरिकाला सिंगापूरमध्ये फाशी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?