Serbia Protest Lithium Mine :  बहुतेक सर्व आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बॅटरीचा उपयोग केला जातो. या बॅटरी तयार करण्यासाठी लिथियमचा वापर केलेला असतो. त्यामुळे लिथियमला `पांढरे सोने` असे म्हटले जाते. या पांढऱ्या सोन्यासाठी जगभरातील सर्व उद्योगप्रधान देश प्रयत्नशील आहेत. लिथियमचा जास्तीत जास्त साठा मिळविण्याचा प्रयत्न करतात. पण सर्बियामध्ये लिथियम खाणीच्या विरोधात नागरिकांनी तीव्र आंदोलनं केली. नागरिकांचा रोष पाहून तेथील सरकारने लिथियमच्या खाणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


सर्बियाच्या पंतप्रधान अना बर्नाबिच यांनी लिथियम खाण योजना रद्द केली आहे. तसेच दिग्गज खाण कंपनी रियो टिंटो यांच्यासोबतचा करारही रद्द केला आहे. रियो टिंटो या कंपनीला युरोपमध्ये पांढरे सोनं म्हणून ओळखलं जाणाऱ्या लिथियमचा शोध घ्यायचा होता. त्यासाठी मोठमोठ्या खाणी खोदण्यात येणार होत्या. पण नागरिकांच्या विरोधानंतर सर्बिया सरकारने रियो टिंटो या कंपनीसोबतचा उत्खनन करार रद्द केला. गेल्या काही दिवसांपासून खाणीच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारलं होतं. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. सर्बियाच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. त्यामुळे लोकांचा रोष पाहून सरकारने रियो टिंटो कंपनीसोबतचा उत्खनन करार रद्द केला.


रियो टिंटो कंपनीसोबतचा खाण करार रद्द केल्यानंतर पंतप्रधान अना बर्नाबिच यांनी सर्बियाच्या नागरिकांना संबोधित केलं. ते म्हणाले की, "आम्ही पर्यावरण संदर्भात प्रदर्शन करणाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसचे रिओ टिंटो यांच्यासोबतचा उत्खनन करार रद्द केला आहे." 


किती मोठी आहे कंपनी?
रियो टिंटो ही 150 वर्ष जुनी अँग्लो ऑस्ट्रेलियन कंपनी आहे. खाण उद्योग क्षेत्रातील रियो टिंटो ही सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीने 2020 मध्ये कर चुकवल्यानंतर 10.4 अरब डॉलरचा नफा कमवला आहे.  


महत्वाच्या बातम्या :



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live