One Chip Challenge : सोशल मिडीयावर एखाद्या चॅलेंजची क्रेझ निर्माण झाल्यास त्याची भुरळ सर्वांनाच पडते. असेच एक सोशल मीडियावर व्हायरल झालेले वन चिप चॅलेंज (One Chip Challenge) अनेक मुलांवर चांगलेच महागात पडले आहे. पाणी न पिता मसालेदार चिप्स खाल्ल्याने अनेक मुले आजारी पडली आहेत. त्यामुळे त्यांना हॉस्पिलटलमध्ये दाखल करावे लागले. कॅलिफोर्निया स्कूल डिस्ट्रिक्टने पुष्टी केली आहे की व्हायरल "वन चिप चॅलेंज" ट्रेंडमध्ये सहभागी झाल्यानंतर किमान तीन हायस्कूल विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मसालेदार चिप्स (Spicy Chip) खाल्ल्यानंतर या मुलांची तब्येत बिघडली.


वन चिप चॅलेंजमध्ये अनेक मुले आजारी पडली


शाळेचे मुख्याध्यापक अॅडम ऑरबॅच (Adam Auerbach) यांनी माध्यमांना सांगितले की, त्यात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अशाच समस्येचा सामना करावा लागला. मसालेदार चिप्स खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. काही विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रासही होत होता. हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनीही मसालेदार चिप्स घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्याला घरी पाठवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत पालकांनाही माहिती देण्यात आली आहे.


वन चिप चॅलेंज म्हणजे काय?


वन चिप्स चॅलेंज हे Paqui ब्रँडने तयार केले आहे. टिकटॉकवर #onechipchallenge हा हॅशटॅग आतापर्यंत 475.5 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. ब्रँडच्या वेबसाईटनुसार, या पोटॅटो चिप्समध्ये कॅरोलिना रीपर आणि स्कॉर्पियन मिरची मिक्स केली होती. तर, या अतिशय गरम आणि काळ्या तिखट मिर्चीपासून बनलेले पोटॅटो चिप्स खाण्याची स्पर्धा मुलांमध्ये रंगली होती. हे चॅलेंज चांगलेच व्हायरलदेखील झाले होते. अनेक मुलांनी हे आव्हान स्विकारले आणि मसालेदार चिप्स खाल्ल्यामुळे ते आजारी पडले. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha