Seema Haider Anju Story:  प्रेमासाठी पाकिस्तानात गेलेली अंजू (Anju) आणि पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा (Seema Haider) यांची लव्ह स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. दोघींनीही  प्रेमासाठी देश सोडले. मात्र पाकिस्तानत गेलेली अंजू रातोरात कोट्यधीश झाली तर भारतात आलेल्या सीमावर उपासमारी वेळ आली आहे .


भारतातातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूवर पाकिस्तानात भेटवस्तूंचा वर्षाव होत आहे.  कोणी प्रीवेडिंगचा खर्च केला तर कोणी 40 लाखांचा फ्लॅट दिला. तर कुणी काही एकरांचा प्लॉट दिला.  तिच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. एवढंच काय तर तिला सरकारी नोकरीही  दिली जाणार आहे. पाकिस्तानच्या याच खैरतीवर संशय व्यक्त करत मध्य प्रदेशचे गृहमंत्री निरोत्तम मिश्रा यांनी स्पेशल ब्रांचला चौकशीचे आदेश दिले आहेत. तर अंजूचं दुबई कनेक्शन सुद्धा समोर आले आहे. नसरुल्लाशिवाय अंजू दुबईतील काहींच्या संपर्कात होती. तिच्या फोनमध्ये दुबईतील काही जणांचे  कॉन्टक्ट डिटेल्स सुद्धा मिळालेत आता या सगळ्याचीही चौकशी सुरु झाली आहे.


एकीकडे हे चित्र तर दुसरीकडे भारतात असलेल्या सीमावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. सचिनकडे नोकरी नाही त्यातच चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने कुणालाही घराबाहेर जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे घरात अन्नधान्याचा तुटवडा असल्याचं सांगितलं जाते. सीमा संदर्भात आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत. सीमा पाच  महिन्याची गर्भवती आहे?तर सीमा आणि सचिनला सिनेमात काम करण्याची ऑफर? आता या गोष्टी खऱ्या आहेत की अफवा हे येत्या काळातच कळेल.  सीमाने यापूर्वी पाकिस्तानातील गुलाम हैदरशी लग्न केलं होतं, त्यांना चार मुलं आहेत. सीमा या चारही मुलांना घेऊन सचिनसोबत राहण्यासाठी भारतात आली. 


 






सीमा हैदरची देखील चौकशी सुरू


पाकिस्तानी महिला सीमा हैदरची भारताच्या नोएडा येथील सचिनबरोबर पब्जी खेळत असताना मैत्री झाली. प्रियकराला भेटण्यासाठी सीमा हैदरने चार मुलांसह नेपाळमधून अनधिकृतपणे भारतात प्रवेश केला. सीमाकडे संशयास्पद चार पासपोर्ट आणि मोबाईल आढळल्याने एटीएसने सीमाची तब्बल आठ तास चौकशी केली. सीमाने कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. चार मुलांची आई असलेल्या सीमाला पबजी खेळण्यास वेळ कसा मिळाला? आणि अवगत तंत्रज्ञान तिला कसं माहित? याबद्दल सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत.


या दोन्ही प्रकरणातलं साम्य सांगायचं झालं तर दोघीही प्रेमासाठी देश सोडून गेल्यात दोघींवरही isi च्या एजंट असल्याचा आरोप आहे.  दोघींनाही आपल्या देशात परतायचं नाही आहे. आता या दोघींचंही गदर प्रेम कथा आहे की गद्दार हे पाहणं महत्त्वाचे असेल. 


हे ही वाचा :


 इंस्टाग्रामवरून जडलं प्रेम! पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत असलेली आणखी एक 'अंजू' पोलिसांच्या ताब्यात