Planetary Parade : लवकरच आकाशात चार ग्रह एका ओळीत पाहता येणार आहेत. हे दृष्य लोकांना पाहण्यासाठी टेलिस्कॉपची गरज भासणार नाही. उघड्या डोळ्यांनी तुम्ही हे आकाशात  दिसणारे दुर्मिळ दृश्य पाहू शकता. या आठवड्यात शनी (Saturn), मंगळ (Mars), शुक्र (Venus) आणि गुरू (Jupiter) हे ग्रह एका ओळीमध्ये दिसणार आहेत. याआधी हे दृश्य 947 मध्ये दिसले होते. सूर्योदयाच्या एक तास आधी आकाशात हे दृष्य पाहता येणार आहे. 


पठाणी सामंता तारांगण प्लॅनेटरी परेडचे उपसंचालक  डॉ एस पटनायक (Dr S Pattnaik) यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं, या आठवड्यात  शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू हे ग्रह एका ओळीमध्ये दिसणार आहेत. याआधी हे दृष्य 947 AD मध्ये दिसले होते. 






उत्तर गोलार्धातील देश म्हणजेच विषुववृत्त रेषेच्या वरच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना हे दुर्मिळ दृश्य पाहता येणार आहे. भारतामधील लोक देखील हे दृष्य पाहू शकणार आहेत. हे दृष्य पाहताना आकाशात प्रदूषणाचे प्रमाण कमी असायला हवे. हे दृष्य पाहण्यासाठी तुम्हाला सूर्योदयाच्या एक तास आधी पूर्व दिशेला आकाशाकडे पाहावे लागेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :