Modi-Putin Meet : भारत-रशिया संबधांच्या दृष्टीने एक महत्त्वाची भेट सोमवारी (6 डिसेंबर) नवी दिल्लीत पार पडणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमार पुतिन (Vladimar Putin) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट होणार आहे. ही भेट 21 व्या भारत-रशिया (Indo-Russia Summit) वार्षिक शिखर परिषदेसाठी घेण्यात येणार आहे. मोदी आणि पुतिन दोघेही बऱ्याच काळानंतर एकमेंकाना भेटणार असून मागील काही काळापासून कोरोना महामारीमुळे दोघांना एकमेंकाना
भेटता आले नव्हते. भारत-रशिया हे दोन्ही देशांना जागतिक पातळीवर मोठा मान असल्याने दोन्ही नेत्यांची भेट एक मोठी गोष्ट आहे.


2000 सालापासून भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद पार पडत आहे. त्यामुळे यंदाचं हे 21 वं वर्ष असणार आहे. अफगाणिस्तानात तालिबानी राज्य आल्यानंतरही मोदी आणि पुतिन यांच्यातील ही पहिलीच भेट असल्याने या विषयावर काय चर्चा होणार? हा एक मोठा प्रश्न आहे. तसंच नुकतीच भारत-चीन-रशिया त्रिपक्षीय बैठक पार पडली. त्यानंतर भारत आणि चीन यांच्या सीमेवर तणाव आणखी वाढले आहेत. त्यामुळे या दौऱ्यावर चीनबाबतही महत्त्वाची चर्चा होऊ शकते.
 
दोन वर्षानंतर मोदी-पुतिन भेट


मोदी आणि पुतिन हे दोघेही नोव्हेंबर 2019 मध्ये ब्राझिलिया येथे झालेल्या BRICS शिखर परिषदेदरम्यान एकमेंकाना प्रत्यक्षात भेटले होते. त्यानंतर 2020 ची भारत-रशिया वार्षिक शिखर परिषद कोविड महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे आता दोन वर्षानंतर दोघेही एकमेंकाना भेटत आहेत.


संबंधित बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha