Russian Journalist Help Ukrainian Children: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. युक्रेनमध्ये प्रचंड विध्वंस होत असताना मोठ्या संख्येने लोकांचे स्थलांतर झाले आहे. युक्रेनमधील युद्धाचा मोठा परिणाम लहान मुलांवरही झाला आहे. दरम्यान, युक्रेनमधील मुलांना मदत करण्यासाठी रशियन पत्रकाराने आपल्या नोबेल पुरस्काराचा लिलाव केला आहे. रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह  (Dmitry Muratov) यांनी सोमवारी रात्री त्यांच्या नोबेल शांतता पुरस्काराचा लिलाव केला. युक्रेनमधील युद्धामुळे विस्थापित झालेल्या मुलांना मदत करण्यासाठी रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह नोबेल पुरस्काराच्या लिलावातून पैसे देतील. मुलांना मदत करता यावी यासाठी ते ही रक्कम थेट युनिसेफकडे हस्तांतरित करतील.


नोवाया गॅझेटा या स्वतंत्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक दिमित्री मुराटोव्ह यांनी सोमवारी युक्रेनमधील युद्धामुळे विस्थापित झालेल्या मुलांना मदत करण्यसाठी 103.5 मिलियन डॉलर्ससाठी नोबेल शांतता पुरस्कार सुवर्णपदकाचा लिलाव केला. एका मुलाखतीदरम्यान मुराटोव्ह यांनी सांगितले की, युक्रेनमधील युद्धादरम्यान अनाथ झालेल्या मुलांची मला काळजी आहे. त्याचे भविष्य आम्हाला परत करायचे आहे, असे ते म्हणाले.


दिमित्री मुराटोव्ह यांना नोबेल पारितोषिक कधी मिळाले?


रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांनी फिलिपिन्स पत्रकार मारिया रासा यांच्यासोबत 2021 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार जिंकला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. ते अशा काही प्रकारांपैकी एक आहेत, ज्यांनी सोव्हिएत युनियमध्ये फूट पडल्यानंतर 1993 मध्ये नोवाया गॅझेटाची स्थापना केली. दरम्यान, रशियामध्ये काम करण्यास बंदी घातल्यानंतर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि देशातील त्यांच्या धोरणावर टीका करणारे हे एकमेव प्रमुख वृत्तपत्र आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: