Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्षांसह 35 आमदार असल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडाळी केल्याने उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी वर्षा बंगल्यावर तातडीने शिवसेना आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत शिवसेनेचे विधानसभेतील 14 आमदार दाखल झाले आहेत. 

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या नावांची यादी वाढत आहे. त्याशिवाय काही आमदारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यामुळे तूर्तास चित्र स्पष्ट झाले नाही. 

या बैठकीत कोण पोहचले ?

1) वैभव नाईक2)  दिवाकर रावते3)  उदयसिंग राजपूत4) विनायक राऊत 5) नरेंद्र दराडे 6) अनिल देसाई 7) विकास पोतनीस8) विनायक राऊत 9) सुभाष देसाई 10) वरूण सरदेसाई11) अरविंद सावंत12) किशोर दराडे 13) किशोर साळवी14) आमशा पाडवी 15) चंद्रकांत रघुवंशी16) रवींद्र वायकर 17) गुलाबराव पाटील 18) संजय राऊत19) नीलम ताई गोरे20) दादा भुसे21) सचिन अहिर22) सुनील शिंदे23) संजय राठोड24) सचिन पडवळ25) अंबादास दानवे26) मंगेश कुडाळकर27) प्रकाश फातर्पेकर28) राहुल शेवाळे29) राहुल पाटील30) सुनील प्रभू31) दिलीप लांडे32) उदय सामंत33)  राजन साळवी