President Volodymyr Zelensky on Russia : युक्रेनवर रशियन हल्ल्याचा आजचा 14 वा दिवस आहे. 14 दिवसांनंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले कमी झालेले नाहीत. राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये आता सर्वत्र विध्वंस दिसत आहे. या सगळ्यात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी ब्रिटीश संसदेत भाषण केलं आणि युक्रेन रशियन हल्ल्यांपुढे झुकणार नाही, असं सांगितलं. त्याचवेळी, झेलेन्स्की यांनी रशियाला 'दहशतवादी देश' म्हणून घोषित करण्याची विनंती देखील खासदारांना केली. 


पाश्चिमात्य देशांच्या मदतीसाठी आम्हाला तुमची मदत हवीये : झेलेन्स्की


व्हिडीओ लिंकद्वारे कनिष्ठ सभागृह 'हाऊस ऑफ कॉमन्स'ला संबोधित करताना अध्यक्ष झेलेन्स्की यांनी 'ऐतिहासिक' भाषण केलं. यावेळी खासदारांनी उभं राहून झेलेन्स्की यांचं स्वागत केलं. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना उद्देशून झेलेन्स्की म्हणाले की, "आम्हाला पाश्चात्य देशांना सहकार्य करण्यासाठी तुमची मदत हवी आहे. या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि बोरिस, मी तुमचा आभारी आहे. "


समुद्रात, हवेत, आम्ही आमच्या जमिनीसाठी लढू, मग काहीही झालं तरी चालेल : झेलेन्स्की


झेलेन्स्की म्हणाले की, "आता आमच्यासाठी असणं किंवा नसणं हा प्रश्न आहे. हा प्रश्न 13 दिवस विचारला गेला असता, पण आता मी तुम्हाला निश्चित उत्तर देऊ शकतो. हे नक्कीच होय आहे, आणि मी तुम्हाला युनायटेड किंग्डमनं आधीच ऐकलेल्या शब्दांची आठवण करून देऊ इच्छितो. आम्ही हार मानणार नाही, आम्ही हरणार नाही. आम्ही शेवटपर्यंत लढू. समुद्रात, हवेत, आम्ही आमच्या भूमीसाठी लढू, काहीही झालं तरी. आम्ही जंगलात, शेतात, काठावर, रस्त्यांवर लढू"


राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पुढे म्हणाले की, "कृपया या देशावर (रशिया) निर्बंध वाढवा आणि कृपया या देशाला दहशतवादी राज्य घोषित करा. आमच्या युक्रेनचे आकाश सुरक्षित राहतील याची खात्री करा" ते म्हणाले, "माझा देश रशियाच्या आक्रमणाविरोधात शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईन."


महत्त्वाच्या इतर बातम्या :