Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. या 10 दिवसांच्या युद्धात युक्रेनची अनेक मोठी शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. अकराव्या दिवसाच्या सुरूवातीला, दोन शहरांमध्ये युद्धबंदीनंतर, रशियाने पुन्हा हल्ला तीव्र केला आहे. शनिवारी रशियन सैन्याने नागरिकांना सोडण्यासाठी सात तासांचा युद्धविराम घेतला. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी पुतीन यांची भेट घेतली आणि आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन आणि रशिया यांच्यात उद्या म्हणजेच 7 मार्च रोजी पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते.


एकीकडे 10 दिवसांच्या लढाईनंतरही युक्रेन किंवा रशिया दोघेही मागे हटण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे शनिवारी युक्रेन सरकारने दावा केला आहे की, 10 दिवसांच्या संघर्षात रशियाने आपले 10 हजार लष्करी जवान गमावले आहेत. चला जाणून घेऊयात गेल्या 10 तासातील 10 महत्त्वाच्या घडामोडी.


1. दहा हजार रशियन सैनिक मारले गेले
युक्रेन सरकारने दावा केला आहे की, रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान 11 दिवसांच्या युद्धात रशियाने आपले 10 हजार लष्करी जवान गमावले आहेत. याशिवाय 269 रणगाडे, 945 बख्तरबंद लढाऊ वाहने आणि 45 मल्टी-रॉकेट लाँच सिस्टम, 79 लढाऊ विमाने आणि रशियन सैन्याच्या हेलिकॉप्टरचाही समावेश असल्याचा युक्रेनच्या सैन्याने दावा केला आहे.


2. सुमारे 351 नागरिकांचा मृत्यू
या युद्धात आतापर्यंत किमान 351 नागरिक मारले गेले आहेत आणि सुमारे 707 लोक जखमी झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे की, मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्यांची वास्तविक आकडेवारी कितीतरी जास्त असू शकते.


3. इस्रायलच्या पंतप्रधानांनी पुतीन यांची घेतली भेट
युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धाने इतर देशांनाही चिंतेत टाकले आहे. शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट रशियाला पोहोचले आणि तेथे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी दीर्घ चर्चा केली. रशियाने युक्रेनवर हल्ला करणे थांबवावे, अशी बेनेट यांची इच्छा आहे. दोन्ही देशांमधील युद्ध अजूनही सुरूच आहे. युक्रेनचे म्हणणे आहे की, युद्धबंदीचा निर्णय झाल्यानंतरही रशियाने दोन शहरांवर अधिक क्षेपणास्त्रे मारणे सुरूच ठेवले आणि त्यामुळे लोकांना तेथून जाण्यासाठी सुरक्षित कॉरिडॉर बनवता आला नाही.


4. झेलेन्स्की यांनी मागितली आर्थिक मदत
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी गेल्या शनिवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली. झेलेन्स्की यांनी जाहीर केले की त्यांनी रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर बोलून रशियाविरुद्ध आर्थिक मदत आणि निर्बंधांवर चर्चा केली कारण त्यांच्या देशाला रशियन सैन्याकडून तीव्र हल्ल्याचा सामना करावा लागत आहे. झेलेन्स्की यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यूएस खासदारांना संबोधित केले. यादरम्यान, झेलेन्स्की यांनी देशाला अधिक मदतीसाठी आणि रशियन तेल आयातीला काळ्या यादीत टाकण्याचे आवाहन केले.


5. युक्रेनियन शिष्टमंडळाचे सदस्य डेनिस क्रीव्ह मारले गेले
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेला आज मोठा धक्का बसला आहे. युक्रेनियन सैन्याने देशद्रोहाच्या आरोपाखाली युक्रेनियन टीमचे सदस्य डेनिस क्रीव्ह यांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. डेनिस क्रीव्ह हे रशिया-युक्रेन वादात युक्रेनच्या शिष्टमंडळाचे सदस्य होते. 


6. युक्रेनला 'नो फ्लाय झोन' घोषित करण्याविरुद्ध पुतिन यांचा इशारा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी सांगितले की, मॉस्कोने युक्रेनवर नो फ्लाय झोन घोषित केल्यास त्याकडे युद्धात सामील होणारा तिसरा पक्ष म्हणून पाहीले जाईल. दरम्यान, युक्रेनच्या अधिकार्‍यांनी आरोप केला आहे की, रशियाने युद्धविरामाच्या विरोधात दोन शहरांवर बॉम्बफेक केल्याने लोकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे.


7. अवघ्या 10 दिवसांत सुमारे 14 लाख लोकांनी युक्रेन सोडले


मारियुपोल आणि वोल्नोवाखा येथे युद्धबंदीची अंमलबजावणी न केल्यामुळे युद्ध संपवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे दिसते. यासह  आहे. पुतिन यांनी युक्रेनवर निर्वासन कार्यात अडथळा आअवघ्या 10 दिवसांत सुमारे 14 लाख लोकांनी युक्रेन सोडलेणल्याचा आरोप करत युक्रेनचे नेतृत्व देशाच्या स्वतंत्र राज्य स्थितीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचा दावाही केला.


8. चर्चेची तिसरी फेरी एक-दोन दिवसांत होणार
युक्रेनियन अध्यक्षीय कार्यालयाचे सल्लागार मायखाइलो पोडोलिक यांनी सांगितले की, रशिया-युक्रेन चर्चेची तिसरी फेरी येत्या काही दिवसांत होईल.  


9. दोन भागात युद्धविराम
रशियन सैन्याने शनिवारपासून युक्रेनच्या दोन भागात युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली होती जेणेकरून तेथे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढता येईल. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थांनी ही माहिती दिली. युद्धविराम कालावधी रशियाच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू झाला. आरआयए नोवोत्सी आणि टास या वृत्तसंस्थेने रशियन संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देऊन म्हटले आहे की मॉस्कोने काही निर्वासन मार्गांवर युक्रेनियन सैन्यासह युद्धविराम करण्यास सहमती दर्शविली.


10. आण्विक सुरक्षेबाबत चिंता
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने सांगितले की, फ्रान्स युक्रेनच्या पाच प्रमुख आण्विक साइट्सची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ठोस उपाययोजना सादर करेल. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या निकषांवर आधारित सुरक्षा उपायांची रचना केली जाईल. रशियन सैन्याने युक्रेनच्या झापोरिझिया अणु प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचे (IAEA) प्रमुख राफ


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha