Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 13 दिवसांपासून घनघोर युद्ध सुरू आहे. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याचा युक्रेनकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. युक्रेनने मोठा दावा केला आहे. रशियन सैन्याचा एक वरिष्ठ अधिकारी युद्धात ठार झाला असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.


'द कीव्ह इंडिपेंडेट' ने रशियन संरक्षण मंत्रालयाच्या गुप्तचर विभागाच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. रशियन सैन्यातील मेजर जनरल व्हिटाली गेरासिमोव्ह (Russian Major General Vitaly Gerasimov) ठार झाले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. खारकीव्हमध्ये सुरू असलेल्या युद्धात गेरामसिमोव्ह ठार झाले आहेत. या युद्धात रशियाचे दोन मोठे सैन्य अधिकारी ठार झाले आहेत. 


कोण होते गेरामसिमोव्ह 


गेरासिमोव्ह हे रशियातील वरिष्ठ लष्करी अधिकारी होते.  त्यांनी दुसऱ्या चेचन्या युद्धात सहभाग घेतला होता. युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमीयाचा ताबा घेतल्याबद्दल त्यांना सन्मानिक करण्यात आले होते. रशियन लष्करी अधिकारी व्हिटाली यांनीही सीरियन युद्धात भूमिका बजावली होती.


पुतीन यांचे खास मेजरही ठार 


काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या सैन्याने रशियन मेजर जनरल आंद्रेई सुखोवेत्स्की यांना ठार केले होते. पुतीन यांचे खास मानले जाणारे आंद्रेई हे रशियाच्या ७व्या एअरबोर्न डिव्हिजनचे कमांडिंग ऑफिसर होते. 24 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या संघर्षात रशियाने आपले दोन सर्वोच्च लष्करी अधिकारी गमावले आहेत. मात्र, रशियन सरकारने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.


रशियाकडून युक्रेनमधील नागरी विमानतळ उद्ध्वस्त


रशियाच्या रॉकेट हल्ल्यात युक्रेनचे विनितसिया येथील नागरी विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. याशिवाय रशियन सैन्याने युक्रेनचे दोन अणुप्रकल्प ताब्यात घेतले असून तिसरा प्रकल्प ताब्यात घेण्याचे रशियन सैन्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा झेलेन्स्की यांनी केला होता.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha