Russia Ukraine War : रशिया- युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. मागील दहा दिवसांपासून युक्रेन धगधगतंय. तात्पुरती शस्त्रसंधी झाली असलीतरी युद्ध संपवण्याचं नाव घेत नाही. मागील दहा दिवसात युद्ध संपवण्यात जगभरातील महासत्तांना अपयश आले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे मोठी हाणी झाली आहे. अनेकांनी युक्रेन सोडण्याचा निर्णयही घेतला. युद्ध सुरु असतानाच युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच रशियाच्या जवळपास दहा हजार सैन्यांना मारल्याचा दावाही केला आहे.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. युक्रेनला 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्याची मागणी राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी नाटोकडे केली होती. मात्र, नाटोने या मागणीला नकार दिला. त्यानंतर झेलेन्स्की यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. यात झेलेन्सकी यांनी म्हटले की, 'नो-फ्लाय झोन' घोषित न करणे म्हणजे नाटोकडून रशियाला हल्ला करण्यासाठी मोकळीक देण्यासारखे आहे. याशिवाय झेलेन्सकी यांनी युक्रेनने रशियाचे दहा हजार पेक्षा जास्त सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तसेच युद्धामुळे युक्रेन सोडणाऱ्या नागरिकांना लवकरच मायदेशी बोलवण्यात येईल.
युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'साठी नाटोचा नकार का?
युक्रेनमध्ये 'नो फ्लाय झोन'ची घोषणा केल्याने रशियासोबत उघडपणे लष्करी संघर्ष होऊ शकतो अशी भीती 'नाटो'ला आहे. युक्रेनपर्यंत मर्यादित असणारा संघर्ष हा युरोपमध्ये फैलावू शकतो. 'नाटो' आपल्या मोहिमेला बळ देण्यासाठी रिफ्युलिंग टँकर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स-सर्व्हिलान्स एअरक्राफ्ट देखील तैनात करावे लागतील. त्यांच्या सुरक्षितेसाठी 'नाटो'ला रशिया आणि बेलारुसमध्ये जमिनीहून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना नष्ट करावे लागतील. त्यामुळे आणखी तणाव वाढू शकतो.
राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की म्हणाले की, फ्रान्स आणि पोलांडच्या राष्ट्रपतीसोबत मदतीसाठी बातचीत केली. तसेच त्यांचे आभारही व्यक्त केले. या संकटकाळात पोलांड आणि युक्रेनमध्ये कोणताही सीमा नाही. तसेच जागतिक बँक आणि आयएपएपच्या अध्यक्षांसोबतही बातचीत खेली. युद्धानंतर युक्रेन कसे असेल.. काय करावे लागेल.. याची चर्चा झाली. चार्ल्स मिशेल आणि उर्सुला वॉन डेर लेयेन यांच्यासोबत यूरोपीय यूनियनमध्ये यूक्रेनच्या सदस्यताबाबत चर्चा केली.