Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युक्रेनमध्ये विध्वंसाची परिस्थिती आहे. रशियाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या सैन्याला ठार मारण्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, आत अनेक देशांनी युक्रेनच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अमेरिका, ब्रिटनसह 28 देशांनी युक्रेनला वैद्यकीय साहित्यासह लष्करी मदत देण्याचे मान्य केले आहे. यासोबतच या देशांनी युक्रेनला शस्त्र उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा केली आहे. रशियन सैनिकांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात युक्रनचे लोक जखमी झाले आहेत. युक्रेनमध्ये नागरिकांसोबतच लष्करी तळांनाही लक्ष्य केले जात आहे.


28 देश युक्रेनला लष्करी मदत देण्यास सहमत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला युक्रेनला 350 दशलक्ष डॉलरची लष्करी मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. रशियाकडे मोठ्या प्रमाणात आधुनिक शस्त्रे आणि सैन्य आहे, त्यामुळे युक्रेनवर दबाव आहे. स्टेट सेक्रेटरी अँटनी ब्लिंकन यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी विदेशी सहाय्य कायद्याद्वारे वाटप केलेले 350 दशलक्ष डॉलर युक्रेनच्या संरक्षणासाठी देण्यात यावे असे निर्देश दिले आहेत.


युक्रेनमध्ये भयावह परिस्थिती
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या आग्नेय झापोरिझ्झ्या भागातील मेलिटोपोल शहरावर ताबा मिळवला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शनिवारी सांगितले की, मॉस्कोने आक्रमण सुरू केल्यानंतर हे शहर ताब्यात घेतलेले पहिले मोठे लोकसंख्या केंद्र आहे. मंत्रालयाने असेही सांगितले आहे की, रशियाने युक्रेनमधील लष्करी तळांवर रात्रभर हल्ले करण्यासाठी हवाई आणि जहाजावर आधारित क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला. रशियन सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांच्या शेकडो लक्ष्यांना लक्ष्य केले आहे. अनेक विमाने आणि रणगाडे आणि तोफखाना, वाहने नष्ट झाली आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha