Russia-Ukraine War : भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युक्रेनमधील  बुखारेस्टला पाठवलेले एअर इंडियाचे विमान तेथून भारतात येण्यासाठी उड्डाण केलं आहे. हे विमान रात्री 8 वाजता मुंबईत दाखल होणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलेल्या 219 भारतीयांसह पहिले विमान रोमानियाहून मुंबईसाठी रवाना झाले आहे.

  


 






डॉ. एस जयशंकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याबाबत आम्ही प्रगती करत आहोत. आमची टीम 24 तास मैदानावर काम करत आहे. मी या सर्व गोष्टींवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून आहे. हे विमान आज मुंबईहून रवाना करण्यात आले होते. यावेळी डॉ एस जयशंकर यांनी ट्विट करत रोमानियाचे परराष्ट्र मंत्री Bogdan Aurescu यांचे आभार देखील मानले आहेत.  


 






 


केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करणार


युक्रेनहून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी फ्लाइट क्रमांक AI1943 ने मुंबई विमानतळावरून पहाटे 3.40 वाजता उड्डाण केले होते. आता हे विमान युक्रेनमधून भारतीय नागरिकांना घेऊन रोमानियाहून निघाले असून एअर इंडीआयचे हे विमान आज रात्री 8 पर्यंत मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायदेशी परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करतील.


दरम्यान, केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :