Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम हा दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. मात्र रशियासारख्या अधिक सैन्य आणि शस्त्रास्त्रांनी संपन्न असलेल्या देशासमोर युक्रेन पूर्णपणे कोलमडले आहे. अशातच अनेक सेलिब्रिटी युक्रेनच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. याच दरम्यान आता हॉलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता लिओनार्डो डी कॅप्रियो याने युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. लिओनार्डो डी कॅप्रियोने 10 मिलियन अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनानुसार सुमारे 76 कोटी रुपये) ची युक्रेनला मदत केली आहे. त्यांची ही आर्थिक मदत युक्रेनला अडचणीच्या काळात मोठा आधार ठरणार आहे. आजवर युक्रेनला झालेली ही सर्वाधिक मदत आहे. 


लिओनार्डोची आजी होती युक्रेनची नागरिक 


लिओनार्डोची आजी युक्रेननी नागरिक होती. त्यामुळे युक्रेनबाबत त्याच्या मनात सहानुभूतीची भावना आहे. त्याचा युक्रेनशी थेट संबध नसला, त्यांची मुळे युक्रेनशी संबंधित आहेत. आता 10 मिलियन डॉलर्सची मदत केल्याने त्याच युक्रेनचं नातं हे आणखीन घट्ट होणार आहे.     


बॉम्ब शेल्टरमध्ये झाला होता लिओनार्डोच्या आईचा जन्म 


लिओनार्डोने अनेकदा सांगितले आहे की, तो अर्धा रशियन आहे. त्याचे आजी आजोबा रशियाचे आहेत. तर काही रिपोर्टनुसार, त्याचे आजी-आजोबा ओडेसा शहरातील आहेत. तर काहींच्या मते ते खेरसनचे होते. ओडेसा आणि खेरसन हे दोन्ही युक्रेनमधील शहर आहेत. लिओनार्डोची आई इमरलिन इंडेनबिर्केनचा जन्म बॉम्ब शेल्टरमध्ये झाला असल्याचं बोललं जात. लिओनार्डोचे आजी-आजोबा रशियन निर्वासित होते. रशियात फेब्रुवारी 1943 साली युद्ध सुरू होते. हवाई हल्ल्यापासून बचावासाठी इमरलिनचे पालक बॉम्ब शेल्टरमध्ये लपले, जिथे इमरलिनचा जन्म झाला.


संबंधित बातम्या: