Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. या युद्धामुळं घाबरलेल्या आणि असहाय्य झालेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. रशिया- युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अनेक देश मध्यस्ती करत आहे. मात्र, अद्यापही रशिया यांच्यातील युद्ध सुरुच आहे. दरम्यान, रशियाचे सैनिक आता युक्रेनची राजधानी किव्हमध्ये ताबा घेतला आहे. याचदरम्यान, किव्ह विमनातळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामुळं आसपासच्या इमारतींना मोठं नुकसान झालंय. मात्र, कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. 


शनिवारी किव्हमध्ये दोन क्षेपणास्त्रे डागण्यात आली, जी शहराच्या मध्यभागी नैऋत्येकडील भागात आदळली,  अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. झुल्यानी विमानतळाजवळील भागात एक क्षेपणास्त्र पडल्याचे त्यांनी सांगितले आहे. दुसर्‍या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की, क्षेपणास्त्रे सेवास्तोपोल चौकाजवळील भागात आदळलं. क्षेपणास्त्रांपैकी एक निवासी इमारतीला धडकलं असल्याचंही सांगण्यात येत आहे. 






युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दमित्रो कुलेबा यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, किव्ह आमचे वैभवशाली, शांत शहर आहे. रशियन भूदलाच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमधून दुसर्‍या रात्री बचावलं आहे.  एक क्षेपणास्त्र किव्हमधील निवासी अपार्टमेंटला धडकलं.  मी जगभरातील देशांना मागणी करतो की, रशियाला धडा शिकवा. त्यांच्या राजदूतांना हद्दपार करा, तेल बंदी घाला, त्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करा. रशियाचे गुन्हेरागी युद्ध थांबवा, असं कुलेबा यांनी म्हटलं आहे.







महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha