Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 105 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत काही मुद्यांवर सहमती झाली असल्याची माहिती फ्रान्सच्या राष्ट्रपती कार्यालयाने दिली. अमेरिका आणि रशियामध्ये शिखर परिषद होणार असून दोन्ही देशांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, रशियाने युक्रेनवर हल्ला केला नाही तरच ही शिखर परिषद होणार आहे.
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे जग पुन्हा महायुद्धाच्या दिशेने जात असल्याची भीती व्यक्त केली जात होती. युक्रेनच्या बाजूने अमेरिका आणि इतर युरोपीयन देश युद्धात उतरण्याच्या तयारीत होते. तर, दुसरीकडे रशियानेदेखील युक्रेनच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले आहे.
या तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्यांवर सहमती झाली. रशिया आणि अमेरिकेमध्ये शिखर परिषद होणार आहे. मात्र, रशियाने युक्रेनवर हल्ला करू नये अशी अट ठेवण्यात आली आहे. त्याशिवाय फ्रान्सने सर्व संबंधित देशांसह युक्रेन शिखर परिषदेचा प्रस्ताव मांडला आहे. फ्रान्सच्या या शिष्टाईनंतर युक्रेन-रशिया तणाव निवळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रशियन सैन्याचा सराव
रशियानं क्षेपणास्त्रांसोबत युद्ध अभ्यास सुरु केल्याने युरोपीयन देशांची चिंता वाढली आहे. जागतिक विरोध डावलत रशियानं राष्ट्रपती पुतीन यांच्या उपस्थितीत क्षेपणास्त्रांसोबत युद्ध अभ्यास केल्याने अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Russia-Ukraine conflict : गरज नसल्यास भारतीय विद्यार्थ्यांनी परत यावे, भारतीय दूतावासाकडून परिपत्रक जारी
- Corona Test : कोरोना चाचणी नको रे बाबा! ‘या’ कारणामुळे रशियात बड्या नेत्यांना कोरोना चाचणीची धास्ती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha