Russia-Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला सुरुवात झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. युक्रेनमधील प्रत्येक शहरात तणावाची स्थिती झाली आहे. चारीबाजूने रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला आहे. यामध्ये युक्रेनच्या 40 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले, त्यानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये अनेक स्फोट ऐकू येत आहेत. युक्रेनचे तिसरे मोठे शहर क्रेमटोर्स्क आणि ओडेसा येथे स्फोटाचा आवाज ऐकू येत आहेत. या युद्धजन्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्रपती स्वत: रणांगणात उतरले आहेत. सैन्याच्या वेशातील युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलंस्की यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. 


रशियासारख्या मोठ्या देशासमोर युक्रेन ताकदीने उभा आहे. कोणत्याही किंमतीत झुकणार नाही, अशी भूमिका युक्रेनने घेतली आहे. यामध्ये सर्वात मोठी भूमिका युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलंस्की यांनी बजावली आहे. आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी व्होदिमर झेलंस्की वेगवेगळ्या देशांसोबत चर्चा करत आहेत. तसेच स्वत: रणांगणात उतरले.
 
व्होदिमर झेलंस्की स्वत: रणांगणात उतरले आहेत. ज्या ठिकाणी रशियाने हल्ले केले आहेत, तेथे त्यांनी भेट दिली आहे. व्होदिमर झेलंस्की यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्होदिमर झेलंस्की सैन्याच्या वेशात दिसत आहेत. व्होदिमर झेलंस्की यांनी सैन्याची कपडे परिधान केली आहेत. सैन्यासोबत परिस्तितीचा आढावा घेतना ते दिसत आहेत. व्होदिमर झेलंस्की यांनी आपल्या सैन्याचं मनोबल वाढवले.


व्होदिमर झेलंस्की यांनी रशियाच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर अनेक देशांनी युक्रेनला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनवरील हल्ल्यानंतर नाटोकडून रशियाला धमकी देण्यात आली आहे. युक्रेनवरील हल्ल्याचा नाटोने निषेध नोंदवला. नाटोचे सेक्रेट्री जनरल जेन्स स्टॉल्टेंबर्ग म्हणाले की, रशिया युक्रेनविरोधात ताकदीचा वापर करत आहे. रशियाने आंतरराष्ट्रीय हवाई नियमांचे उल्लंघन केले आहे. रशियाने हल्ला थांबवला नाही, तर मोठी किंमत मोजावी लागेल.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :