Russia Ukraine Crisis : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. युद्धाच्या सातव्या दिवशीही दोन्ही देशांकडून माघार घेण्याची शक्यता नाही. युद्धात रशिया आणि युक्रेनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांनी चितावणीखोर वक्तव्य केलं आहे. तिसरं महायुद्ध झालं तर ते आण्विक आणि विनाशकारी असेल, असं वक्तव्य रावरोव्ह यांनी केलं आहे.  


गेल्या गुरूवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानंतर रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला आहे. त्यानंतर दोन्ही देशांमुध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. परंतु, दोन्ही देश नरमाईची भूमिका घेण्यास तयार नाहीत. दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत असतानाच व्लादिमीर पुतीन अणुयुद्धाच्या तयारीत आहेत. त्यातच आता रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अणुयुद्धाची शक्यता आणखीनच बळावली आहे. 
 
"तिसरं महायुद्ध झालंच तर हे अण्वस्त्र युद्ध असले आणि हे अतिशय घातक युद्ध असेल असं लावरोव्ह यांनी म्हटलं आहे. लावरोव्ह यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील सर्वच देशांच्या चिंतेत भर पडली आहे.  






रशिया-युक्रेनच्या युद्धाची झळ जगभरातील अनेक देशांना बसू लागली आहे. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ही वाढ आणखी होण्याची शक्यता आहे. भारतालाही या दोन्ही देशांच्या युद्धाची झळ बसत आहे. भारतातील खाद्यतेलाच्या कमितीत वाढ झाली आहे. इंधनाचे आणि खाद्यतेलाचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमर झेलेन्स्की यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून संवाद साधला आहे. यामध्ये त्यांनी आतापर्यंत रशियाचे तब्बल सहा हजार सैनिक मारल्याचा दावा केला आहे. तर रशियाच्या सैन्यानेही युक्रेनला चारही बाजूंनी वेढले असल्याचा दावा केला आहे.  


महत्वाच्या बातम्या