Ukraine Russia Conflict : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी पुन्हा एकदा रशिया (Russia) युक्रेनवर (Ukraine)  हल्ला करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत रशिया युक्रेनवर हल्ला करणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्याशी याबाबत कोणताही चर्चा झाली नाही, असे जो बायडेन म्हणाले आहेत. आम्ही कोणताही हल्ला करणार नाही, असे स्पष्टीकरण रशियाच्या विदेश मंत्रलयाकडून आले आहे. AFP ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


रशिया युक्रेवर हल्ला करणार असल्याची चेतावणी मागील काही दिवसांपासून बायडेन प्रशासन देत आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनच्या सीमेवरील आपल्या सैनिकांना माघारी बोलवणार असल्याचे सांगितले आहे. युक्रेनच्या सीमेवरुन रशियन सैन्याची कोणताही माघार पाहायला मिळत नसल्याचे याआधी अमेरिकेचे विदेशमंत्री अँटनी ब्लिंकनने (Antony Blinken) सांगितले होते. अद्यापही युद्धाचा धोकाय कायम असल्याचे त्यांनी सांगितले होते.  






रशियाच्या दाव्यावर अमेरिकेने वारंवार उपस्थित केले प्रश्न -
रशियाच्या दाव्यावर अमेरिकेने वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रशिया उक्रेनवर कधीही हल्ला करु शकतो, असा दावा बुधवारी व्हाइट हाऊसने केला होता. जेन साकी यांनी उक्रेनवर कधीही हल्ला होऊ शकतो, असा दावा केला होता.  साकी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की,  “ कोणताही बोगस दावा करत रशिया उक्रेनवर हल्ला करु शकतो. हा हल्ला कोणत्याही क्षणी होऊ शकतो.” अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी 'एबीसी न्यूज'ला सांगितले की, आम्ही रशियन सैन्य माघारी जाताना पाहिले नाही. पुतीन कधीही हल्ला करू शकतात. युक्रेनवर हल्ला करायचा असल्यास त्यासाठी ही सुसज्जता असल्याचे त्यांनी म्हटले. 


रशियाने काय म्हटले ?
युक्रेनजवळ तैनात असलेल्या काही सैन्यांनी त्यांचा सराव पूर्ण केला आहे. सैन्य लवकरच माघारी निघणार आहे. युद्ध टाळण्याचे राजनैतिक प्रयत्नही सुरू होते, असे रशियन संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने बुधवारी सांगितले होते. 


युक्रेनमधील भारतीय लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक - 
युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाच्या मदतीने हे लोक फ्लाईट आणि इतर गोष्टींची माहिती गोळा करू शकतात. यासाठी युक्रेनमधील भारतीय एंबेसी +380997300428 आणि 38099730483 या क्रमांकांवर कॉल करू शकतात. या हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार आहेत. 


तिसऱ्या महायुद्धाचा होता धोका - 
रशिया-युक्रेनमध्ये युद्ध झाले असते तर तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली असती. युक्रेनच्या बाजूने अमेरिकेसह युरोपीयन देशांनी मदत करण्याचे जाहीर केले होते. नाटो सदस्य देशांनी आपले सैन्यही सज्ज ठेवले होते. तर, रशियाने चीनसोबत चर्चा केली होती.