Riots break in Paris Franc News : फ्रान्सच्या संसदीय निवडणुकीनंतर (Franc Election) पॅरिसमध्ये (Paris) दंगल उसळल्याची घटना घडली आहे. यामुळं तिथं मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. फ्रान्समध्ये डाव्या विचारसरणीच्या न्यू पॉप्युलर फ्रंटने आघाडीने दुसऱ्या फेरीत रविवारी सर्वाधिक जागा जिंकण्याची तयारी केली आहे. तर उजव्या पक्षांनी पहिली फेरी जिंकली होती. त्यामुळं त्यांनी निवडणूक जिंकण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. पुढचे सरकार युतीतूनच स्थापन होण्याची अपेक्षा आहे. मात्र, दुसऱ्या फेरीतील कल जाहीर झाल्यानंतर दंगल उसळली आहे.
फ्रान्स निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत मोठा बदल दिसून आला आहे. युरोपियन युनियनच्या निवडणुकीनंतर फ्रान्समध्ये विजयाचा दावा करणारी नॅशनल रॅली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने पुनरागमन केले आणि 168 जागा जिंकल्या आहेत.
फ्रान्समध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. परंतू यापैकी कोणत्याही गटाला बहुमत न मिळाल्याने देशाला त्रिशंकू संसदेची शक्यता आहे. 577 जागांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये साधारणपणे 289 हा बहुमताचा आकडा आहे. कट्टर डावे, ग्रीन्स आणि सोशलिस्ट यांचा समावेश असलेल्या डाव्या आघाडीला 184-198 जागा मिळण्याची शक्यता आहे. मॅक्रॉनच्या यांच्या पक्षाला 160-169 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उजव्या आघाडीच्या पक्षांना 135-143 जागा मिळण्याची शक्यता आहे. पॉप्युलर फ्रंट नावाच्या डाव्या गटात फ्रान्सचा समाजवादी पक्ष, फ्रेंच कम्युनिस्ट पक्ष, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि फ्रान्स अनबोव्हड नावाचा हरित राजकीय पक्ष यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पहिल्या फेरीत राष्ट्रीय रॅलीच्या अप्रतिम विजयानंतर अतिउजव्यांना पूर्णपणे जिंकण्यापासून रोखण्यासाठी पक्षांनी संभाव्य युती केली होती.
पोलिसांनी सोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या
दरम्यान, उसळलेया दंगलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्या आहेत. तसेच यामध्ये अनेक आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. निदर्शक आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचेही पाहायला मिळाले.
महत्वाच्या बातम्या:
लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता; प्रणिती शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप