Kim Jong Un Lookalike Howard X : जगभरातील फुटबॉलप्रेमींचं (Football) लक्ष लागलेली फिफा फुटबॉल विश्वचषक (FIFA World Cup 2022) स्पर्धा जिंकून अर्जेंटिना (Argentina) विश्वविजेता ठरला आहे. फ्रान्स (France) आणि अर्जेंटिना संघातील सामना रोमांचक ठरला. मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न साकार झालं. दरम्यान, या सामन्यामधील उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह 'किम जोंग उन' (Kim Jong Un) याचा फोटो व्हायरल होत आहे. पण या फोटो मागचं सत्य काही वेगळं आहे. कतारमध्ये पार पडलेल्या फिफाच्या अंतिम सामन्यामधील उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन (Kim Jong-un) सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीचे (Duplicate) फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल व्हायरल होत आहे. फिफामधील या हुबेहुब दिसणाऱ्या किम जोंग उनची सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चा होत आहे. 


जगात एकाच चेहर्‍याचे 'सात' मिळते-जुळते चेहरे असतात असं म्हणतात आणि याचीच अनुभव या व्यक्तीला पाहिल्यावर येतो. या व्यक्तीचं नाव हावर्ड एक्स (Howard X)  आहे. हावर्ड एक्स हुबेहुब किम जोंग उन सारखा दिसतो. कतारमधील फिफामध्ये त्याला पाहताच सगळे चकित झाले. अनेकांनी कुतूहल म्हणून हुबेहुब किम जोंग उन सारख्या दिसणाऱ्या हावर्ड एक्ससोबत फोटो आणि व्हिडिओ काढले. हे फोटो आण व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.


व्हायरल व्हिडिओ : फिफामध्ये उत्तर कोरियाचा हुकूमशाह 'किम जोंग






डिसेंबर महिन्यात फिफाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हॉवर्डने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात त्याने लिहिलं होते की, 'फिफा फुटबॉल विश्वचषक 2030 मध्ये उत्तर कोरियासाठी लॉबिंग करत आहे. कतारमध्ये मला खूप छान वाटत आहे, कारण माझ्या आजूबाजूला शांतता आहे. मेट्रोपासून फक्त 20 मिनिटे चालल्यावर तुम्हाला थंडगार बिअर मिळेल.'


कोण आहे हावर्ड एक्स? ( Who is Howard X ) 


किम जोंग उन सारख्या दिसणारा हावर्ड एक्स चिनी ऑस्ट्रेलियाई (Australian-Chinese) वंशाचा नागरिक आहे. हावर्ड एक्सचं मूळ नाव हावर्ड ली ( Howard Lee ) आहे. हावर्ड एक्स (Howard X) व्यवसायाने म्युझिक प्रोड्युसर ( Music Producer) आहे. हावर्ड एक्स दिसायला हुबेहुब किम जोंग प्रमाणे दिसतो, त्यामुळे अनेकांचं लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं. हावर्डने सांगितलं, तो उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंगची नक्कल सर्वांना हसवण्यासाठी, व्यंग म्हणून करतो.


उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन ( Supreme Leader of North Korea Kim Jong-un )


उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उन (Kim Jong-un) हा त्याच्या मनमानी कारभार आणि विचित्र निर्बंध यामुळे कायम चर्चेत असतो. उत्तर कोरियाच्या नागरिकांवर अजब नियम लादल्यामुळे अनेक वेळा किम जोंगवर टीका झाली आहे. मात्र किम जोंग अजब फर्मान आणि विचित्र कारणांसाठी नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा देत निर्घृणतेचा कळस गाठला आहे.