Red Bull Founder Death : एनर्जी ड्रिंक (Energy Drink) 'रेड बुल'चे (Red Bull) मालक डायट्रिच मॅटेस्किट्झ (Dietrich Mateschitz) यांचं निधन झालं आहे. ऑस्ट्रियन उद्योगपती डायट्रिच यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एनर्जी ड्रिंक कंपनी 'रेड बुल'चे सहसंस्थापक आणि रेड बुल फॉर्म्युला नव रेसिंग टीमचे (Formula One Racing Team) संस्थापक डायट्रिच मॅटेस्किट्झ (Dietrich Mateschitz Death) यांचं निधन झालं आहे.


ऑस्ट्रियन उद्योगपती मेटशिट्झ यांनी 1984 मध्ये एनर्जी ड्रिंक कंपनी 'रेड बुल'ची (Red Bull) स्थापना केली. तसेच फॉर्म्युला वन रेसिंग टीम ब्रँडच्या शेअर्समध्येही त्यांचा मोठा वाटा होता. 'रेड बुल' एनर्जी ड्रिंक ब्रँडच्या 49 टक्के शेअर्स मालकी डायट्रिच मॅटेस्किट्झ यांच्या नावावर आहे.


टेक्सासच्या ऑस्टिन येथील रेड बुल रेसिंग टीमच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी डायट्रिच मॅटेस्किट्झ यांचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. त्यांचा मृत्यू कुठे आणि कसा झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 






मॅटेस्किट्झ यांचा 172 देशांमध्ये व्यवसाय 


ऑस्ट्रियन-थाई ग्रुप रेड बुलचा चेहरा म्हणून मॅटेस्किट्झ प्रसिद्ध होते. मॅटेस्किट्झ यांनी जगभरातील 172 देशांमध्ये त्याच्या रेड बुलचा व्यवसाय पसरवला. कॅफीन आणि टॉरिन-आधारित एनर्जी ड्रिंक रेड बुलचे गेल्या वर्षी  सुमारे 1000 दशलक्ष कॅन विकले गेले. मॅटेस्किट्झ यांनी रेड बुल एनर्जी ड्रिंकला जगभरात लोकप्रिय करण्यासोबतच इतर क्षेत्रातही नाव कमावलं. रेसिंग टीम, मीडिया, तसेच रिअल इस्टेट आणि गॅस्ट्रोनॉमी या क्षेत्रातही त्यांचा व्यवसाय आहे.


1984 मध्ये 'रेड बुल' कंपनीची स्थापना 


डायट्रिच मॅटेस्किट्झ (Dietrich Matesitz) यांनी 1984 मध्ये एनर्जी ड्रिंक 'रेड बुल' कंपनीची स्थापना केली. त्याच्या 20 वर्षांनंतर मॅटेस्किट्झ यांनी जॅग्वॉर एफ वन टीम (Jaguar F1 Racing Team) विकत घेतली. त्यानंतर त्यांनी या टीमचं नाव बदलून रेड बुल रेसिंग टीम (Red Bull Racing Team) असं ठेवलं.