Sri Lanka reserch on Pushpak Viman : जगातल्या पहिल्या विमानाने कुणी आकाशात झेप घेतली याचं उत्तर अनेकजण राईट बंधू असंच देतील. पण श्रीलंकेतल्या लोकांना हे मान्य नाही. जगातलं पहिलं विमान रावणाचं होतं, तोच जगातला पहिला पायलट होता असाच विश्वास श्रीलंकेच्या लोकांचा आजही आहे. रावणाच्या पुष्पक विमानावर आता श्रीलंकेत संशोधन सुरु असून रामायणाची ही कथा मिथक असल्याचं श्रीलंकेतल्या लोकांना मान्य नाही.
रावणाने श्रीलंका ते भारत प्रवास केला
श्रीलंकेतील बहुसंख्य लोकांचं हे मत आहे की, रावणाच्या काळात श्रीलंकेत एअरपोर्ट होतं. रावणाच्या लष्कराच्या ताफ्यात पुष्पक विमान होतं. रावणच जगातला सर्वात पहिला पायलट होता. आता या विषयावर तज्ज्ञ, इतिहासकार, पुरातत्व खात्याचे अभ्यासक, वैज्ञानिक यांची कोलंबो या ठिकाणी एक बैठक पार पडली. रावणानेच जगातले पहिले विमान आकाशात उडवलं होतं यावर या बैठकीत एकमत झालं. रावणाने या विमानाच्या माध्यमातून भारत ते श्रीलंका या दरम्यान प्रवास केला होता असं या बैठकीत तात्पर्य काढण्यात आलं. त्यामुळे आता रावणाच्या पुष्पक विमानाच्या पुराव्याचा शोध घेण्यासाठी संशोधन सुरु करण्याचं ठरलं आहे.
संशोधनासाठी श्रीलंकन सरकारकडून 50 लाख रुपये जाहीर
कोलंबोमध्ये झालेल्या या बैठकीनंतर श्रीलंकन सरकारने रावणाच्या पुष्पक विमानाच्या पुराव्याच्या शोधासाठी 50 लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. या आधीही रावणाच्या विमानाच्या शोधासाठी संशोधन सुरु करण्यात आलं होतं. पण लॉकडाऊनच्या काळात हे संशोधन थांबवण्यात आलं आहे. आता पुन्हा नव्यानं हे संशोधन सुरु करण्यात आलं आहे.
भारतात ज्या पद्धतीने अनेक लोकांकडून रामायणाच्या कथेला सत्य मानलं जातं त्याच पद्धतीने श्रीलंकेतही मानलं जातं. त्या देशातल्या अनेक पुस्तकांमध्ये रावणाच्या संदर्भाबद्दल लिखान झालं आहे. श्रीलंकेकडून लवकरच एक उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार असून त्याचं नाव रावण असं ठेवण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :