नवी दिल्ली : राफेल डिलमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून फ्रेन्च कंपनी डसॉल्टने भारतीय दलालाला 10 लाख युरोंची घसघशीत रक्कम दिल्याचा दावा फ्रान्सच्या मीडियापार्ट (Mediapart.fr) वेबसाइटने केला आहे. त्यामुळे राफेलचे भूत पुन्हा एकदा मोदी सरकारच्या मानगुटीवर बसणार का असा प्रश्न विचारला जातोय.


या वेबसाईटने सांगितल्याप्रमाणे, या व्यवहारातील भ्रष्टाचाराची माहिती सर्वप्रथम फ्रान्सच्या भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा AFA ला 2016 मध्ये लागली होती. त्यानुसार 2018 साली कंपनीच्या बॅंक खात्याची चौकशी केली असता त्यामध्ये 'क्लायंटला गिफ्ट' या नावाखाली मोठी रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. 


आता या प्रकरणावरुन पुन्हा एकदा काँग्रेसने मोदी सरकारवर कडाडून हल्ला केला आहे. या व्यवहारात या आधी काँग्रेसकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत होते ते खरे असल्याचा दावा आता पुन्हा एकदा काँग्रेसने केला असून मोदींनी यावर देशाला उत्तर द्यावं अशीही मागणी केली आहे. 


 






गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी विरोधी पक्ष काँग्रेसने सरकारवर राफेलच्या व्यवहारावरून टीकेची राळ उठवली होती. या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं सांगत विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं होतं. पण नंतर सर्वोच्च न्यायालयाने राफेलचा व्यवहार हा कायदेशीर असल्याचं  सांगत या व्यवहाराला हिरवा झेंडा दाखवला होता आणि विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेतली होती.


भारत आणि फ्रान्स या दोन देशांच्या दरम्यान राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार 2016 साली झाला होता. या करारानुसार, भारत फ्रान्सकडून 36 लढाऊ विमान खरेदी करणार आहे. त्यापैकी काही विमाने भारतीय वायू दलाच्या ताफ्यात आली असून बाकीची विमाने ही पुढच्या वर्षीपर्यंत येणार आहेत. 


महत्वाच्या बातम्या :