Quad : इंडो-पॅसिफिक प्रदेश हा मुक्त आणि सुरक्षितच राहीला पाहिजे असा ठराव क्वॉड देशांच्या पहिल्या बैठकीत करण्यात आला आहे. या गटाच्या झालेल्या बैठकीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान सूगा वर्च्युल हे सहभागी झाले होते.


जर आपण सर्व एकत्रित आलो, एकमेकांना सहकार्य केलं तर या प्रदेशातील मूल्ये आणि या प्रदेशाची सुरक्षितता कायम राहील असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. इंडो-पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्यता आणि विकासाच्या मुद्द्यावर हे देश एकत्रित येत आहेत असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. क्वॉड हा इंडो-पॅसिफिक प्रदेशातील भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा गट आहे. या गटाकडून इंडो-पॅसिफिक प्रदेशातील एकमेकांच्या हितसंबंधांचे संरक्षण केले जाते.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सांगितलं की क्वॉड देशांचा गट हा इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्य वाढवण्यासाठी महत्वपूर्ण आहे. क्वॉड गटातील भारत अमेरिका,जपान आणि ऑस्ट्रेलिया या चारही देशांचे चीनसोबत असलेले संबंध ताणलेले आहेत. भारत आणि चीन या दोन देशांदरम्याने नुकतंच लडाखच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्याचं पहायला मिळालंय. 


coronavirus | कोरोनाची सुरुवात कशी झाली? वुहानमधील एक महिन्याच्या तपासानंतर WHO जाहीर करणार अहवाल


क्वॉड देशांनी वतीने युरोपीयन देश आणि इतर महत्वाच्या देशांशी सहकार्य वाढवावा असाही सूर या बैठकीच्या दरम्यान उमटला. परंतू क्वॉड गटाच्या विस्तारावर कोणतीही चर्चा झाली नाही. क्वॉड देशांची ही बैठक म्हणजे इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनला देण्यात आलेला एक प्रकारचा शह असल्याचं सांगण्यात येतंय. भारताच्या वतीने या गटातील देशांना कोरोनाच्या लसीकरणाच्या उत्पादनासाठी आणि वितरणासाठी मदत करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. 


फेब्रुवारीमध्ये चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने भारतावर टीका केली होती. त्यामध्ये म्हटलं होतं की, भारत हा SCO आणि BRICS या गटांसाठी निगेटिव्ह अॅसेट्स बनत चालला आहे, त्याचे आता काही महत्व राहिलं नाही. भारताने या गटामध्ये चीनचा पाठिंबा गृहीत धरला असून भारत चीनला नेहमी स्ट्रॅटेजिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय. 


Sonam Wangchuk | सैनिकांसाठी 'रँचो'चा नवा अविष्कार, बोचऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी सोनम वांगचुक यांनी बनवला खास तंबू