वुहान : कोरोनाची सुरुवात नेमकी कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी WHO ची एक टीम चीनमधील वुहानमध्ये संशोधन करत आहे. या टीमचे संशोधन आता अंतिम टप्प्यात असून त्याचा अहवाल येत्या 15 मार्चला जाहीर करण्यात येणार असल्याचं WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसिस यांनी सांगितलं आहे.


हा अहवाल दोन टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे असं या आधी स्पष्ट करण्यात आलं होतं. आता हे दोन्ही टप्प्यातील संशोधन हे एकाच वेळी जाहीर करण्यात येणार असल्याचं WHO चे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसिस यांनी सांगितलं आहे.


जगात कोरोनाचा प्रसार चीनमधून झाला आहे. डिसेंबर 2019 साली चीनच्या वुहान या शहरात पहिल्यांदा कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यामुळे कोरोनाची निर्मीती नेमकी कशी झाली आणि त्याचा प्रसार कसा झाला याचा अभ्यास करण्यासाठी WHO ची एक टीम चीनमधील वुहानमध्ये संशोधन करत आहे. ही टीम गेली महिनाभर या शहरात संशोधन करत आहे.


Coronavirus : लोकल, सार्वजनिक कार्यक्रमामुळे कोरोना संसर्ग वाढला, केंद्रीय पथकाचा अहवाल


प्राण्यांमधून कोरोनाव्हायरस पसरल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज
जागतिक आरोग्य संघटनेच्या पत्रकार परिषदेत सिंघुआ विद्यापीठातील चिनी वैज्ञानिक लियांग वानियान सांगितलं होतं की, SARS-CoV-2 वटवाघुळ आणि खवल्या मांजरांमध्ये आढळको. कदाचित कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण हेच असू शकतात कारण कोरोना व्हायरस आणि SARS मध्ये साम्य आहे. मात्र या प्रजातींमध्ये अद्याप SARS-CoV-2 चा प्रत्यक्ष संबंध आढळलेला नाही.


जगभरात पसरलेला कोरोनाचा विषाणू हा वुहानमधील एका प्रयोगशाळेतून पसरला असल्याचं सांगण्यात येत होतं. या मताचं चीनने या आधीच खंडण केलं आहे.


Aurangabad Partial Lockdown: औरंगाबाद जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन, काय सुरु, काय बंद?